WHAT'S NEW?
Loading...

CCE SoftwareVersion 2.05 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस मध्ये तयार केलेले एक युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही तुमचा सर्व निकाल कोणत्याही लिमिटेशन शिवाय सहज तयार करू शकाल. जनरल रजिस्टर सॉफ्टवेअर नंतरचे व त्यापेक्षाही उपयुक्त व दर्जेदार..!!

हे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही काय काय करू शकाल?

 • संपूर्ण नोंदवही दोन्ही सत्रात प्रिंट करता येईल.
 • नोंदवहीसाठी आकर्षक मुखपृष्ठ
 • अनुक्रमणिका व इतर सर्व चार्टसहित..
 • प्रथम व द्वितीय सत्र निकालपत्रक
 • विद्यार्थी फोटोसहित आकर्षक प्रगतीपत्रक
 • इतर आवश्यक एकवट तक्ते
 • तुमच्या सर्व नोंदी व निकाल यांची pdf पुस्तिका तयार करा...

या CCE 2.05 ची वैशिष्टे

 • सर्व पेजेस A4 पेजेसवर प्रिंट होतील..
 • ऑफिस २०१० व पुढील व्हर्जनसाठी एका क्लिकवर pdf
 • इयत्ता १ ते ८ वी आणि एका इयत्तेच्या नऊ तुकड्यासाठी एवढे एकच सॉफ्टवेअर पुरेसे आहे.
 • विद्यार्थीसंख्येला मर्यादा नाही.
 • विद्यार्थी संख्येनुसार स्वयंरचना करणारे पहिलेच सॉफ्टवेअर..
 • सर्व वार्षिक तक्ते एका छताखाली
 • विद्यार्थी डेटा इम्पोर्ट व एक्स्पोर्ट सुविधा.. एका क्लिकवर
 • आकर्षक रचना
 • तुम्ही भरलेली माहिती एक्सेलमध्ये एक्स्पोर्ट करू शकता.
 • रंगीत व कृष्णधवल प्रिंटींग एका क्लिकवर शक्य..
 • तुमचे सर्व सेटिंग्ज सेव होतात.

हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी काय आवश्यक आहे?

 • मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे 2007, 2010, 2013, 2016
 • किंवा पुढील व्हर्जन ( प्रोफेशनल )
 • युनिकोड फॉन्ट आवश्यक
 • सोबत Utsaah हा फॉन्ट दिला आहे..

हे सॉफ्टवेअर मोबाईलवर वापरता येईल का?

 • नाही! हे मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस मध्ये बनवले असून ते फक्त पीसीवरच चालेल.

CCE 2.03 चा डेमो व्हिडीओ पहा ..


CCE 2.05 डाउनलोड लिंक:

इम्पोर्ट व एक्स्पोर्ट सोपे.. एका क्लिकवर.अपग्रेड करताना टाईप केलेला डेटा नवीन सॉफ्टवेअर मध्ये वापरता येईल..

हे सॉफ्टवेअर मागील वर्षीचे असून या वर्षीचे सॉफ्टवेअर Home वर क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शकता.


शेवटचा अपडेट दिनांक 09-12-2017 | 7:00 AM

CCE 2.0 Software वापरण्याची संपूर्ण माहिती..

अनुक्रमणिका :

 1. हे सॉफ्टवेअर चालण्यासाठी आवश्यक बाबी..
 2. Security Alert Enable करणे..
 3. Sign In or Login:
 4. होम पेज:
 5. पायाभूत माहिती:
 6. सत्र, इयत्ता, तुकडी निहाय मूल्यमापन भारांश निश्चिती:
 7. माहेवार कामाचे दिवस :
 8. विद्यार्थी यादी:
 9. विद्यार्थ्याचा फोटो प्रगतीपत्रकात..:
 10. Default Value Setting:
 11. आकारिक-संकलित गुणनोंद फॉर्म
 12. वर्णनात्मक नोंदी फॉर्म
 13. माहेवार उपस्थिती:
 14. सर्व माहितीचा स्टेट्स होम पेजवर:
 15. प्रिंट नोंदवही:
 16. प्रिंट सत्र 1 निकाल:
 17. प्रिंट सत्र व वार्षिक निकाल:
 18. प्रिंट प्रगतीपत्रक:
 19. Export Data:
 20. Import Data:
 21. काही समस्या व त्यावरील उपाय:

हे सॉफ्टवेअर चालण्यासाठी आवश्यक बाबी..


 1. आपल्या संगणकात Utsaah फॉन्ट असावा नसेल तर तो सोबत दिला आहे. त्यावर राईट क्लिक करून इंस्टॉल करून घ्यावा.
 2. Microsoft Access 2007 वा पुढील व्हर्जन
  आपल्या संगणकात हे सॉफ्टवेअर आहे की नाही हे चेक करण्यासाठी कीबोर्डवरील विंडोज की प्रेस करा आणि access असा सर्च द्या. जर आपणास वर हे सॉफ्टवेअर दिसले तर आपण हे CCE सॉफ्टवेअर लगेच रन करू शकता.
 3. किंवा या पानाच्या शेवटची माहिती वाचावी.. चला सुरु करूया..

Security Alert Enable करणे..


 1. सॉफ्टवेअर चालू केल्यानंतर प्रथम आपणास सोबत दिलेली इमेज दिसेल येथे तुम्हाला Enable Content करावा लागेल. जर तुम्ही ऑफिस २००७ वापरत असाल तर हा मेसेज प्रत्येक वेळी दिसेल. तर डिसेबल करता येतो.
 2. जर तुम्ही ऑफिस २००७ वापरत असाल तर Options निवडून आलेल्या बॉक्स मधून Enable this content करून ओके करावे.
 3. आता तुम्हाला लॉगीन/साईन इन डायलॉग बॉक्स दिसेल..

Sign In or Login:


 1. सेक्युरिटी अलर्ट एनेबल केल्यानंतर आपणास लॉगीन व्हावे लागेल.
 2. सुरुवातीचा default युजरनेम व पासवर्ड आहे Admin
 3. Sign Up करून हा युजरनेम व पासवर्ड बदलू शकता.
 4. Sign Up करा युजरनेम व पासवर्ड टाका खालील सेव बटन प्रेस करा. नवीन युजर तयार होईल.
 5. आता Sign In करून नवीन युजरनेम व पासवर्ड वापरून Sign In व्हा.!!
 6. या विंडो पाठीमागील चित्र तुम्ही बदलू शकता. यासाठी img फोल्डर मधील login.jpg ही इमेज बदला..

होम पेज:

 1. एकदा का लॉगीन झाला कि लगेच तुम्हाला होम पेज दिसेल.
 2. हे एक Dashboard आहे. येथे सर्व डेटा एन्ट्री फॉर्म व रिपोर्टच्या लिंक दिल्या आहेत.
 3. वरच्या पहिल्या पट्टीत टायटल व लॉगीन युजरचे नाव दिसेल.
 4. खालच्या पट्टीत सर्व डेटा एन्ट्रीचा स्टेट्स दिसेल जसे की, इयत्ता विद्यार्थी संख्या, शिक्षक, तुकड्या मुले व मुली यांची संख्या व इतर भरलेल्या माहितीची संख्यात्मक आकडेवारी..
 5. मधल्या भागात सर्व फॉर्म व प्रिंट रिपोर्ट लिंक दिल्या आहेत. याचे पाच भाग केले आहेत.
 6. पायाभूत माहिती
 7. माहिती व प्रिंटसाठी सेटिंग्ज
 8. डेटा एन्ट्री फॉर्मस्
 9. प्रिंट नोंदवही
 10. प्रिंट निकाल व एकवट तक्ते

पायाभूत माहिती:


 1. प्रथम शाळेची बेसिक माहिती भरा आणि पुढे जा.
 2. हे सॉफ्टवेअर सर्व ठिकाणी युनिकोड फॉन्ट वापरणार असल्याने त्याचे टाइपिंग आपणास करता येणे गरजेचे आहे. 
 3. यासाठी आपण गुगल इनपुट टूल किंवा आय एस एम किंवा इतर कीबोर्ड इंजिन वापरू शकता..

 1. या विंडोत इयत्ता निवडा व समोर त्या इयत्तेसाठी शाळेत असणाऱ्या तुकड्यांची संख्या लिहा.
 2. जर तूमची शाळा एक ते चार असेल आणि प्रत्येकी एक तुकडी असेल तर पाचवी व पुढील भागातील सर्व नोंदी क्लिअर करा.
 3. जर तुमची शाळा ५ ते ८ असेल तर एक ते चार अनुक्रम असलेल्या ठिकाणचा कंटेंट क्लीअर करा.
 4. अधिकचे जात संवर्ग लिहा. व जात संवर्ग क्रम बदला. हा बदल विद्यार्थी यादी येथे टाईप करण्यापूर्वी करावा.
 5. जर विद्यार्थी यादी टाईप करून त्यातील सर्वग लिहल्यावर हा बदल केल्यास विद्यार्थी यादीत पुन्हा बदल करावा लागेल.

 1. वर्गशिक्षक या ठिकाणच्या शिक्षकांच्या जागी बदला म्हणजे क्रम तोच राहील.
 2. सर्व १ ते ८ साठीच्या सर्व तुकडीच्या वर्गशिक्षकांची नावे येथे लिहा.
 3. समजा दोनच शिक्षक असतील तर खालील दोन नावे डिलीट करा.

 1. या विंडोत एक ते आठची एक एक तुकडी तयार केली आहे.
 2. चारच वर्ग असतील तर खालील तुकड्या डिलीट करा.
 3. एखाद्या इयत्तेच्या दोन तुकड्या असतील तर तुकडी या स्तंभात पहिल्या तुकडीसाठी १ तर दुसऱ्या तुकडीसाठी २ लिहावे.
 4. आपल्या शाळेतील एकूण तुकड्या-एवढ्याच ओळींचा वापर करावा. शेवटी एक कोरी ओळ दिसेल ती दुर्लक्षित करावी.
 5. तुकडी संकेतांक आपोआप तयार होईल. तो होणे गरजेचे आहे. जर इयत्ता व तुकडी डबल झाली तर एरर मेसेज दिसेल.

सत्र, इयत्ता, तुकडी निहाय मूल्यमापन भारांश निश्चिती:


 1. एक ते आठ साठी पहिल्या तुकडीसाठी भारांश निश्चिती केली आहे. ती तुम्ही बदलावी.
 2. ही भारांश निश्चिती करताना सुरुवातील होम पेज वरून सत्र इयत्ता व तुकडी निवडा. या किमती सेट करा.
 3. सोबत दिलेल्या विंडोमध्ये सत्र इयत्ता व तुकडी दिसेल गुण मर्यादा सेट करा. एकूण गुण १०० पेक्षा कमी वा जास्त येणार नाहीत याची काळजी घ्या.
 4. मूल्यमापन गुण नोंदी करण्यापूर्वी ही भारांश निश्चिती करून घ्या.

माहेवार कामाचे दिवस :


 1. जून ते मे महिनावार कामाचे दिवस येथे लिहावेत.
 2. यानंतर विद्यार्थी हजेरी / उपस्थिती लिहावी.

विद्यार्थी यादी:

 1. विद्यार्थी यादी टाईप करण्यासाठी होम पेजमध्ये सत्र, इयत्ता व तुकडी निवडा.
 2. विद्यार्थी रोल नंबर लिहणे आवश्यक आहे.या रोल नंबर नुसार सर्व माहिती क्रमान्वित होणार आहे.
 3. एक नोंद पूर्ण झाल्यावर दुसरी रो आपोआप तयार होईल.
 4. विद्यार्थी यादी लिहल्याशिवाय मुल्यमापन नोंदी व इतर माहिती भरता येणार नाही.
 5. एखादा विद्यार्थी दुसऱ्या सत्रात आला असेल तर पहिल्या सत्रात रोल नंबर कोरा ठेवावा.
 6. एखादा विद्यार्थी दुसऱ्या सत्रात गेला असेल तर दुसऱ्या सत्रात रोल नंबर रिकामा ठेवा.
 7. एखादा विद्यार्थी डिलीट केला तर त्याचे सर्व रेकॉर्ड जसे मूल्यमापन नोंदी, हजेरी, वर्णनात्मक नोंदी इ. सर्व डिलीट होईल.
 8. विद्यार्थी माहिती ही तीन प्रकारे दिसणाऱ्या फॉर्मपैकी आपणास आवडणाऱ्या पद्धतीने भरता येईल.
 9. विद्यार्थी यादी कोणत्याही क्रमाने लिहली तरी चालेल फक्त रोल नंबर योग्य ठेवा.
 10. विद्यार्थी माहिती लिहताना त्या विद्यार्थ्याचा फोटो दिसण्यासाठी पुढीलप्रकारे कृती करावी.

विद्यार्थ्याचा फोटो प्रगतीपत्रकात..:


 1. फोटो हे jpg या इमेज प्रकारातील असावेत.
 2. सर्व विद्यार्थ्यांचे फोटो हे सॉफ्टवेअर शेजारील Photo या फोल्डरमध्ये पेस्ट करा.
 3. त्या फोटोला रिनेम करा.
 4. राईट क्लिक करून रिनेम करा. अथवा
 5. फोटो सिलेक्ट करून F2 की प्रेस करा.
 6. सलग फोटो रिनेमसाठी एकदा F2 की प्रेस केल्यावर पुढील फोटोला नाव देण्यासठी Tab की वापरा.
 7. फोटोला नाव हे त्या विद्यार्थ्याचा रजिस्टर नंबर द्यावा.
 8. अंक इंग्रजी असावेत. स्पेस वा इतर अक्षरे नकोत.

Default Value Setting:

 

 1. विद्यार्थी यादी वेगाने टाईप करण्यासाठी/ होण्यासाठी त्यांच्यातील कॉमन भाग या विंडोमध्ये एकदा सेट करून ठेवता येईल जो तेथे आपोआप येईल.
 2. अशा सेटिंग्जमुळे वेळेची व श्रमांची कमालीची बचत होईल.

आकारिक-संकलित गुणनोंद फॉर्म

 1. हा फॉर्म तुम्हाला अशी सुविधा देतो की ज्यायोगे तुम्हाला कमी वेळेत बिनचूक माहिती भरता येते.
 2. होम पेजवरून सुरुवातीला सत्र, इयत्ता, तुकडी व विषय निवडा. आकारिक संकलित हे बटन निवडा.
 3. या नोंदी करण्यापूर्वी त्या विषयासाठी भारांश निश्चिती करणे गरजेचे आहे.
 4. जी तंत्रे निवडली असतील व त्यांच्या कमाल गुणांपेक्षा अधिक गुण या ठिकाणी टाईप केल्यास अलर्ट मेसेज मिळेल.
 5. न निवडलेल्या तंत्रासाठीचे टेक्स्ट बॉक्स आपोआप लॉक झालेने वेग वाढेल.
 6. किती नोंदी करावयाच्या आहेत हेही तुम्हाला येथे कळेल.

वर्णनात्मक नोंदी फॉर्म

 1. येथे तुम्ही सत्रनिहाय निवडलेल्या तुकडीसाठीची प्रत्येक विषयासाठी नोंद लिहावयाची आहे.
 2. या नोंदी पुन्हा पुन्हा वापरण्यासाठी या नोंदीची ड्रॉपडाऊन लिस्ट तयार करता येईल.
 3. ड्रॉपडाऊन लिस्ट तयार करण्यासाठी वेगळा फॉर्म दिला आहे.
 4. ड्रॉपडाऊन लिस्ट नोंद घेऊन त्यात बदल करता येईल.
 5. इयत्ता व विषय यानुसार ड्रॉप डाऊन लिस्ट तयार करता येईल.
 6. ही नोंद कोणत्या सत्रासाठी हवी आहे त्याचे सेटिंग निवडता येईल.

माहेवार उपस्थिती:

 1. माहेवार उपस्थिती येथे तुकडी निवडून लिहता येईल.
 2. केलेल्या व पटानुसार करावयाच्या नोंदी किती याची संख्या खाली दिसेल.
 3. १००% उपस्थिती बटन वापरून तुम्ही त्याचा वेगाने टाइपिंगसाठी उपयोग करू शकता..

सर्व माहितीचा स्टेट्स होम पेजवर:

 1. शाळेचा एकूण पट, शिक्षक संख्या निवडलेली इयत्ता इत्यादीची सांखिकी माहिती खाली दिसेल.
 2. ही माहिती अपडेट होण्यासाठी रिफ्रेश बटन प्रेस करा. अथवा 'निवडा' बटन दाबा.
 3. सर्व बटन डिसेबल झाल्यास रिफ्रेश बटन प्रेस करावे.

प्रिंट नोंदवही:


 
 1. संपूर्ण नोंदवही सत्रनिहाय प्रिंट करता येईल.
 2. मुखपृष्ठ प्रिंट करण्यासाठी त्या तुकडीस त्या सत्रासाठी वर्गशिक्षक निवडलेला असावा.
 3. त्या तुकडीच्या सर्व मूल्यमापन नोंदी पूर्ण केल्यावर तुम्ही नोंदवही प्रिंट करू शकता.
 4. नोंद प्रिंट करण्यापूर्वी ती पूर्ण पाहण्यासाठी खाली डावीकडे तळाला पेज वर खाली करण्याचे बटने आहेत.
 5. एका तुकडीतील सर्व मुलांची प्रिंट व पीडीएफ एका वेळेस करता येईल.
 6. प्रिंट वा पीडीएफ साठी राईट क्लिक करून योग्य तो ऑप्शन निवडा.
 7. सर्व पीडीएफ एकत्र करून तुम्ही एकच फाईल तयार करू शकता.
 8. सर्व प्रिंट या A4 कागदावर सेट केल्या आहेत.    

प्रिंट सत्र 1 निकाल:

 1. सत्र एक साठी वेगळा फॉरमॅट तयार केलेला आहे. जो आपण प्रथम सत्राखेर देता येईल.
 2. मुलांचे फोटो निकालपत्रकात येण्यासाठी त्यांचे फोटो या फोल्डरमध्ये रजिस्टर नंबरने जेपीजी इमेज असाव्यात.
 3. एका तुकडीतील सर्व मुलांची प्रिंट व पीडीएफ एका वेळेस करता येईल.
 4. प्रिंट वा पीडीएफ साठी राईट क्लिक करून योग्य तो ऑप्शन निवडा.

प्रिंट सत्र व वार्षिक निकाल:


 1. सर्व प्रिंटींग करताना तुम्हास तीन ऑप्शनद्वारे प्रिंटींग करता येईल.
 2. एक सर्व प्रिंटींग रंगीत
 3. दोन सर्व प्रिंटींग black टेक्स्टमध्ये
 4. किंवा तिसरे हेडिंग साठी ग्रे कलरमध्ये..
 5. सत्र २ निवडल्यानंतर आपण सत्र दोनसाठीचा निकाल प्रिंट करू शकाल.

प्रिंट प्रगतीपत्रक: 1. प्रगती पत्रकात फोटो प्रिंट करता येईल.
 2. प्रगती पत्रक दोन नमुन्यात उपलब्ध आहे.
 3. प्रगती पत्रकाचे प्रिंटींग करण्यासाठी कागद A4 च्या अर्धा करावा (14.8cm X 21cm) आणि
 4. तो उभा प्रिंटरमध्ये ठेऊन प्रिंट द्यावी.
 5. एकाच पानावर दोन्ही पेज प्रिंट करण्यासाठी pdf करा. आणि त्यातील एका पेजवर दोन प्रिंट हा ऑप्शन निवडा आणि प्रिंट करा.
 6. Black Text साठी वेगळा नमुना आहे. 

Export Data:

 1. ड्रॉपडाऊन लिस्टमधून एक्पोर्ट करावयाचा डेटा निवडा.
 2. हा डेटा एक्सेलला एक्स्पोर्ट होईल.
 3. एका दिवासात एकदा एक प्रकारचा डेटा एक्पोर्ट होईल.
 4. एकाच प्रकारचा डेटा दिवसात दोनदा एक्पोर्ट केल्यास अगोदरचा डेटा निघून जाईल.
 5. ही फाईल Export या फोल्डरमध्ये असेल.
 6. इम्पोर्ट करण्यासाठी हा एक्पोर्ट फाईल नमुना वापरावा.

Import Data:


 1. एक्पोर्ट लिस्टमधील कोणताही डेटा इम्पोर्ट करता येईल.
 2. इम्पोर्ट करण्यासाठी हा एक्पोर्ट फाईल नमुना वापरावा.
 3. प्रथम नमुना फाईल एक्पोर्ट करून घ्या.
 4. त्यामध्ये एडिटिंग करा.
 5. आय डी नंबर हे डुबलीकेट होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. असे रेकोर्ड इम्पोर्ट होणार नाही.
 6. जात संवर्ग, मुलगा मुलगी, वर्ष, इयत्ता, तुकडी या सर्वांसाठी १,२.. असे संकेतांक वापरले आहेत.
 7. हे संकेतांक बेसिक सेटिंग मध्ये पहावयास मिळतील.
 8. फाईल एडीट झाल्यानंत त्या फाईलचे नाव बदलू नये.
 9. ती फाईल Export या फोल्डर मध्येच असू द्यावी.
 10. त्याचे नाव कॉपी करण इम्पोर्ट येथे पेस्ट करा.
 11. इम्पोर्ट बटन प्रेस करा. जर काही चूक नसेल तर तुम्हाला खालील मेसेज पाहवयास मिळेल.
 12. सर्व स्टेट्स संख्या अपडेट होण्यासाठी एकदा रिफ्रेश बटन प्रेस करा.

काही समस्या व त्यावरील उपाय:

 1. हे सॉफ्टवेअर योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी सॉफ्टवेअर ओपन करताना आलेला अलर्ट एनेबल करावा यामुळे सॉफ्टवेअरमधील कोडींग एनेबल होईल. या VBA कोडींगमध्ये अनेक सूत्रे व विविध प्रोसिजर आहेत. हा अलर्ट काय आहे..? या VBA मधून अनेक विघ्नसंतुष्ट लोक व्हायरस तयार करून आपल्या संगणकात बरेच बदल करू शकतात. आणि आपली security धोक्यात येते. यासाठी ही सॉफ्टवेअर फाईल बनवणारी व्यक्ती/कंपनी आपल्याला माहिती असेल, त्यांच्यावर विश्वास असेल तर आपण हा कंटेंट एनेबल करावा. आणि मी संजय गोरे, एक शिक्षक! विश्वास ठेवून बिनधास्त ही सॉफ्टवेअर फाईल ओपन करू शकता...!!
 2. आपण जर मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2016 चे लेटेस्ट सॉफ्टवेअर असेल तर इमेज दिसतील किंवा प्रिंट होतील. काही 2016 च्या व्हर्जनमध्ये इमेज दिसणे व प्रिंट होणे याला समस्या आहेत. हा मायक्रोसॉफ्टचा bug आहे. या सॉफ्टवेअरमध्ये काही प्रॉब्लेम नाही.
 3. आपणाकडे जर असे अपडेट अथवा अॅक्सेस सॉफ्टवेअर पिसित नसेल तरीही आपण हे सॉफ्टवेअर पुढील पद्धत वापरू शकाल.
 4. Google वर 'Runtime Access 2007' (56MB) (किंवा पुढील) software सर्च करून ते इंस्टॉल करून हे सॉफ्टवेअर चालवू शकता.
 5. शाळेचा लोगो वापरण्यासाठीची इमेज ही .png ह्या प्रकारातील आहे. ती img फोल्डर मध्ये असावी. आणि त्या इमेजला logo असे नाव द्यावे.
 6. प्रगती पत्रकात मुलांचे फोटो वापरण्यासाठीची पद्धत येथे दिली आहे. विद्यार्थ्याचा फोटो प्रगतीपत्रकात..
  लॉगीन किंवा साईन इन फॉर्मवरील इमेज बदलण्यासाठी login.jpg ही इमेज याच नावाने बदलावी.
 7. या प्रकारे प्रगती पत्रक इमेज त्याच प्रमाणात बदलता येणे शक्य आहे.
 8. विषयांची नावे बदलता येतात.
 9. जात संवर्ग वाढवता येतात. यासाठी बेसिक सेटिंग्ज मध्ये बदल करावेत. पण हे बदल विद्यार्थी यादी टाईप करण्यापूर्वी करावी. अन्यथा पुन्हा विद्यार्थी यादीतील जात संवर्ग अपडेट करावा लागेल.
 10. हे सॉफ्टवेअर फक्त युनिकोड फॉन्टवर आधारित आहे. आपल्या पिसीत जर 'Utsaah' हा मराठी युनिकोड फॉन्ट नसेल तर आपण प्रथम तो इंस्टॉल करून घ्यावा. सोबतच्या font फोल्डरमध्ये तो दिला आहे.
 11. आपल्या सूचना, प्रतिक्रिया या व्हिडीओच्या खाली कमेंट मध्ये द्याव्यात वा मेल कराव्यात. sanjaysgore@gmail.com
 12. मी फक्त हे तयार केलेले सॉफ्टवेअरमधील कंटेंट याशी संबंधित आहे. हा फॉन्ट किंवा मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस© ही त्या त्या कंपनीची मालकी आहे. हे सॉफ्टवेअर चालण्यासाठी जे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे ऑफिस सॉफ्टवेअर लागते. त्याची मुदत किंवा वैधता / अवैधता याशी हा सॉफ्टवेअर निर्माता संबंधित नाही. 
 13. हे सॉफ्टवेअर २०१७-१८ या वर्षासाठी वापरता येईल यानंतर आपणास अधिक सुविधा असणारे लेटेस्ट सॉफ्टवेअर पुढील वर्षी जुलै-ऑगस्ट मध्ये प्राप्त होईल. यासाठी या साईटला पुन्हा भेट द्यावी..
 Thank you for visiting and using this CCE 2.0 !!!

Download link:

इम्पोर्ट व एक्स्पोर्ट सोपे.. एका क्लिकवर.अपग्रेड करताना टाईप केलेला डेटा नवीन सॉफ्टवेअर मध्ये वापरता येईल..
शेवटचा अपडेट दिनांक 09-12-2017 | 7:00 AM
Download

101 comments: Leave Your Comments

 1. नमस्कार सर, आपण नियमीत नवनविन उपक्रम तयार करून आम्हा सर्वांचा वेळ कसा वाचेव याबाबतीत प्रयत्नशिल असतात, आपण तयार केलेले सातत्यपुर्ण सर्वकष मुल्यमापन सॉफ्टवेअर मुळे सर्वांचे काम अतिशय सोपे, सुटसुटीत करून दिलेले आहे. त्यामुळे निश्चीतच वेळेची बचत होईलच व सर्वांमध्ये एक सारखे पणा दिसेल, आपले खुप खुप आभार सर,

  ReplyDelete
 2. सदर सॉफ्टवेअर हे Sign Out हो नाही, तसेच इयत्ता निवडीचे टॅब ओपन होत नाही

  ReplyDelete
 3. हर्षल सरजी, नमस्ते
  आपण सॉफ्टवेअर वापरून पहिले धन्यवाद..!!
  पायाभूत माहिती व्यवस्थित भरल्याशिवाय इयत्ता ड्रॉपडाऊन लिस्ट कार्य करणार नाही. तसेच साईन आउट च्या वरील क्लोज बटन प्रेस केल्यास सॉफ्टवेअरमधून बाहेर पडता येईल.

  ReplyDelete
 4. नेहमीप्रमाणेच अतिशय उपयुक्त,सोपे व सुटसुटीत सॉफ्टवेअर... Happy Diwali sir.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद पाटील सर

   Delete
 5. Very Nice !
  User Friendly !!
  Most Useful !!!

  ReplyDelete
 6. अतिशय उपयुक्त असा सॉफ्टवेयर निर्मिती....
  Hard work आणि आपल्या कल्पनेला, समर्पण वृत्तीला सलाम!

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद सोमनाथ सर,
   आपल्या कल्पनाही यामध्ये घेतल्या आहेत..!!

   Delete
 7. खुपच छान सरजी.आपल्या कार्याला सलाम.

  ReplyDelete
 8. सर आप की इस मेहनत और लगन को हमारा सलाम

  ReplyDelete
 9. गोरे सर आप्रितीम खूप खूप छान

  ReplyDelete
 10. नमस्कार सरजी.हा software Windows XP मध्ये चालेल का?

  ReplyDelete
  Replies
  1. शाम सर,
   विंडोज xp मध्ये युनिकोड सपोर्ट नसेल तर तो तयार करावा लागेल. आणि फॉन्ट इंस्टाल करण्याची पद्धत वेगळी आहे. आणि सोबत एक्सेल २००७ आवश्यक आहे. हे सर्व असल्यास चालू शकेल. करून पहिले नाही.

   Delete
 11. Rishidada
  .......

  Excellent

  ReplyDelete
 12. सर तुमचा मना पासुन अभिनंदन

  ReplyDelete
 13. Great job sir congratulation

  ReplyDelete
 14. खूपच सुंदर

  ReplyDelete
 15. सर्व मित्रांचे मनापासून धन्यवाद. आपण दिलेले फीडबॅक, प्रतिक्रियांना वैयक्तिक प्रतिसाद देणे शक्य नसल्याने एकत्रित आभार मानतो.

  ReplyDelete
 16. नमस्कार गोरेसर !प्रथम तुमचे आभार मानतो, की आपण एवढे परिश्रम घेऊन हे सॉफ्टवेयर बनवलात आणि आम्हाला अगदी मोफत दिलात. माझा प्रश्न असा आहे की जर मी या चालू वर्षीची सर्व माहिती भरली तर सदर सर्व माहिती सन २०१८-१९ साठी पुन्हा नव्याने भरावी लागेल? का आपोआप पुढेही continue होईल ? जसे- 1 ली च्या मुलाचे नाव ,लिंग , जन्मतारीख , पत्ता , ID इत्यादी . pz give me answer.

  ReplyDelete
 17. गोरे सर खूपच छान,अभिनंदन .इयत्ता tab ओपेन होत नाही

  ReplyDelete
 18. खूप सुंदर बनवलेले आहे.आपल्‍या मेहनतीला नमस्‍कार.

  ReplyDelete
 19. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आम्हा सर्वांसाठी हे सॉफ्टवेअर तयार केलात याबद्दल आम्ही सर्व आपले आभारी आहोत. सॉफ्टवेअर अतिशय सोपे व उपयुक्त आहे.

  ReplyDelete
 20. खरच...खूपच प्रेरणादायी काम ...आपल्या सारखे शिक्षक आहेत तोपर्यंत आपल्या शाळांच्या कडे कोणीही बोट करण्याचे धाडस करणार नाही
  .... hats of u sir......great work

  ReplyDelete
 21. खुपच छान सर .
  सलाम आपल्या कार्याला .

  ReplyDelete
 22. नमस्कार गोरेसर !प्रथम तुमचे आभार मानतो, की आपण एवढे परिश्रम घेऊन हे सॉफ्टवेयर बनवलात आणि आम्हाला अगदी मोफत दिलात.
  THANKS LOT OF GORE SIR सलाम आपल्या कार्याला

  ReplyDelete
 23. i want to create two files of two different schools on one laptop. Is it possible ? How ?

  ReplyDelete
 24. अप्रतिम...
  सर आपण विकसित केलेली संगणक प्रणाली वापरण्यास अतिशय सोपी व सुटसुटीत आहे. फक्त एकच समस्या आहे हि प्रणाली आम्हास इंग्रजी भाषेत उपलब्ध होईल का? कारण आमची शाळा इंग्रजी माध्यमाची आहे.

  ReplyDelete
 25. अत्यंत उपुक्त आणि वेळ तसेच मानसिक तनावातून मुक्ति देणारे सॉफ्टवेअर आहे
  धन्यवाद आपले आपण अशी सुविधा आम्हाला प्राप्त करून दिल्याबद्दल

  ReplyDelete
 26. अत्यंत उपुक्त आणि वेळ तसेच मानसिक तनावातून मुक्ति देणारे सॉफ्टवेअर आहे
  धन्यवाद आपले आपण अशी सुविधा आम्हाला प्राप्त करून दिल्याबद्दल

  ReplyDelete
 27. आदरणीय संजय गोरे सर आपण खूपच छान CCE SOFTWARE बनवले आहे.मनपूर्वक अभिनंदन सर, यापुढेही नवनवीन software चा वापर करण्याचा आनंद आम्हांला मिळेल.धन्यवाद

  ReplyDelete
 28. मा.गोरे सर , धन्यवाद
  फार सुंदर software आहे. कृपया शिक्षकांचे तासिका वाटपाच्या संदर्भात software असेल तर पाठवावे.
  धन्यवाद

  ReplyDelete
 29. खरंच खूप छान !

  User च्या मनातील जवळजवळ सर्व शंका सोडवण्याचा हातखंडा वाखाणण्यासारखा आहे.
  Great work sir!!💐💐

  ReplyDelete
 30. मनापासून सलाम,Hard Work.

  ReplyDelete
 31. अतिशय उपयुक्त असा सॉफ्टवेयर निर्मिती....
  Hard work आणि आपल्या कल्पनेला, समर्पण वृत्तीला सलाम

  ReplyDelete
 32. सर, हे सॉफ्टवेअर कसे डाउनलोड करावे व वापरावे याविषयी माहिती pdfकिंवा vide० असेल तर दयावेत कृपया

  ReplyDelete
 33. अनेक शिक्षकांचा वेळ वाचविला सर ,हा विद्यार्थी रूपी आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी राहो.

  ReplyDelete
 34. Nice sir


  सर प्रगती पत्रकावर मुलाचा आधार नंबर व मोबाइल नंबर ऍड करता येईल का ?

  ReplyDelete
 35. नमस्कार सर
  अतिशय उत्तम सॉफ्टवेअर आपण खुप मेहनतीने बनवलात. मला मुल्यमापन भारांश निश्चितीमध्ये परिसर अभ्यास हा विषय दिसत नाही . काय करावे ?

  ReplyDelete
 36. खुपच छान सर

  ReplyDelete
 37. काही शंका असतील तर मला इमेल करावा. इमेल सॉफ्टवेअरमध्ये दिला आहे. आधार नंबर टाकता येतो. मोबाईल नंबर नाही.. परिसर अभ्यास विषय दिसत नसला तरी प्रिंट मध्ये येईल. मार्क भरताना विषयांचा क्रम सेटिंग्ज मध्ये दिला आहे त्याचा रेफरन्स घ्यावा. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद..!!
  आपणास येणाऱ्या त्रुटी दूर करून अपडेट सॉफ्टवेअर अपलोड केले आहे. अगोदरचा कोणताही डेटा वाया जाणार नाही. तो सहज इम्पोर्ट करता येईल सोबत दिलेली नोट फाईल वाचावी व कृती करावी.
  धन्यवाद..!!

  ReplyDelete
 38. वरील सर्व सूचना वाचून अपडेट केले आहे.
  धन्यवाद..!!

  ReplyDelete
 39. आदरणीय गोरे सर!
  Sallute ! आपल्या कार्याला..

  आज प्रत्येक शिक्षक online व offline कामाने बेजार झाला आहे. विविध social media व इतर माध्यमातून या वाढत्या कामाबद्दल विरोध होत आहे. कित्येक प्रशासकीय ग्रुपमधून शिक्षक left झाले आहेत. याचं मूळ कारण म्हणजे - आम्हाला शिकवू द्या हो आणि या अवास्तव माहितीतून आमची सोडवणूक करा.

  कितीही ओरड केली तर काम मात्र करावेच लागतं. आणि त्यावेळी मात्र फक्त तुम्हीच आमच्या मदतीला येतात, कारण आपण तयार केलेली सर्वच software शिक्षकांना एक मित्रासारखीच हक्काची वाटतात.

  आपल्या सारखा महागुरू राज्याचा programmer असेल तर शिक्षकांचा खूप वेळ वाचून होणारी ओरड थांबेल व शासनाचेही कार्य सुकर होईल !

  सलाम आपल्या कार्याला !

  ReplyDelete
  Replies
  1. mala problem yetoy sir general no. 1013 ytpe kelyavr dist nahi tsech nondi kartana vidyarthi salect katana yet nahi piease guidence karave

   Delete
 40. software मध्ये dropdown नोंदी import करताना ERROR असा message येतो .कृपया मार्गदर्शन व्हावे.

  ReplyDelete
 41. सर एकदम छान साफ्टवेअर आहे.

  ReplyDelete
 42. सर छान ...... वर्णनात्मक नोंदी सेव्ह होताना एरर येतोय .

  ReplyDelete
 43. अप्रतिम........खूप काम कमी झाले या software मुळे......

  ReplyDelete
 44. आपण छान software तयार केले धन्यवाद.प्रगती पुस्तकावर लोगो घेण्यासाठी काय करावे.please help me

  ReplyDelete
 45. Varnanatmak nondi drop-down madhe tumhich add Karun thevla tr ajun vel vachel

  ReplyDelete
 46. सर आपण खूप छान softwere बनवले आहे. आम्हाला ते खूप उपयोगी पडत आहे. सर माल एक समस्या आलेली आहे प्रगती पत्रकाची प्रिंट काढताना इंग्रजी विषयामध्ये सर्व मुलांची क१ श्रेणी येत आहे. त्यमुळे प्रगती प्रिंट काढता येत नाही. कृपया मदत करावी हि विनंती. आपल्या उत्तराची वाट पाहतो.

  ReplyDelete
 47. सर तुमचा मना पासुन अभिनंदन

  ReplyDelete
 48. सर तुमचा मना पासुन अभिनंदन

  ReplyDelete
 49. सर, हे सॉफ्टवेअर खूप चांगले आहे, आम्ही वापत्र आहोत पण त्यात वर्ग 6 तर 8 च्या वर्णनात्मक नोंदी चा ड्रॉपडाउन बॉक्स मध्ये नोंदी नाहीत त्या कश्या घ्याव्यात ते सांगाल

  ReplyDelete
 50. सर आपण बनविलेले साॅफ्टवेअर खूप छान व उपयुक्त आहे. सर त्यामध्ये वार्षिक निकालपत्रकात इंग्रजी विषयात संकलितचे गुण येत नाहीत. व प्रगतीपत्रकामध्ये. सर तुमचा इमेल आयडी 9423319311 या नंबरवर पाठवा.प्लीज

  ReplyDelete
 51. अतिशय छान व उपयुक्त सॉफ्टवेअर ज्यामुळे वेळ व श्रमाची बचत होऊन अचूक निकाल मिळेल
  धन्यवाद सर

  ReplyDelete
 52. सर आपले मंनापासून अभिनंदन !!!!!!!

  ReplyDelete
 53. सर, शाळा श्रेणी तक्त्यामध्ये विद्यार्थी संख्या दुप्पट दिसत आहे. उदा. अ श्रेणी मध्ये १० असतील तर या तक्त्यामध्ये २० दिसत आहेत.

  ReplyDelete
 54. सर आपण बनवलेले सॉफ्टवेअर खूपच छान आहे आणि वापरण्यास ही सुलभ आहे. पण मला विद्यार्थी नोंद dropdown menu द्वारे करताना अडचण येत आहे. त्यासंबंधी स्पेशल व्हिडिओ असेल तर send करा, अथवा त्यासंबंधी विस्तृत माहिती पाठवावी ही विनंती.,🙏🙏🙏🙏

  ReplyDelete
 55. आदरणीय गोरे सर ,
  शिक्षण क्षेत्रात आपण करीत असलेल्या अतिउत्तम कार्यासाठी शुभेच्छा . Cce2.0 हे आपले अतिशय सुंदर सॉफ्टवेअर आहे या मुळे समस्त शिक्षक जातीचे परिश्रम कमी होण्यास मदत झाली आहे. निकाल, नोंदवही, प्रगतीपत्रक, गोषवारा इ बाबी खूप सहज व सोप्या झाल्या आहेत.
  या सॉफ्टवेअर ला, विध्यार्थी संचिका, व जनरल रजिस्टर दाखले हे सॉफ्टवेअर add करता आले तर बरे होईल तसेच नोंदवही, प्रगतीपत्रक याठिकाणी वर्गशिक्षक व मुख्याध्यापक यांची सही आहे तेथे त्यांचे नाव पण टाकता आले पाहिजे

  ReplyDelete
 56. अप्रतिम सुंदर सर अतिशय योग्य व अभ्यासपूर्ण software बनवल्याबद्दल धन्यवाद

  ReplyDelete
 57. सर CCE 2.5 हे software तयार करण्यासाठी कोणत्या software चा वापर केला आहे.

  ReplyDelete
 58. sir cce ha English medium karita kasa use karava sir ani tyvaril logo kasa change karava

  ReplyDelete
 59. गोरे सर,नमस्कार

  खूपच उपयुक्त सॉफ्टवेयर

  ReplyDelete
 60. English विषयाचे गुण भरतांनी गुणनोंद विषयनिहाय मध्ये बेरीज बरोबर होत आहे पण निकालपत्रक बघितला तर फक्त आकारिकच्या गुणांची नोंद झालेली दिसते
  उपाय सांगा

  ReplyDelete
 61. really its nice and helpful

  ReplyDelete
 62. Sirji cce software download hot nahi

  ReplyDelete
 63. सर आपले खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप चंगले SOFTWARE बनवले आहे. माझी अडचण हि कि दोन्ही सत्राचे एकत्रित प्रगती पत्रक प्रिंट घेता येईल का ? व प्रिंट पिवळ्या जाड पेपर वर घेतली तर चालेल का ?

  ReplyDelete
 64. सर एवढे उत्तम software तयार केल्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन !
  माझा प्रश्न असा आहेकि मि हे software एका computr ल download केले.त्यानंतर त्याला copy करुन इतर copmuterवर त्याला load kele. तर मुळ computer मधे cce 2.5 ase folder creat houn tyachyat photo folder madhil photo pragatipuatakavar disatat rajister no.dilyanantar.
  Parantu itar coputervar te photo folder madhe gheun tyana raji.no. dile tari tya computervaril pragatipustakat te disat nahit.
  Kay problem asava.ka pratek computer la swatantrapane website varunach he software download karave lagel.plz reply...!

  ReplyDelete
 65. सर पहिला सत्र निकाल सदर softwer मध्ये केला होता,आता सदर softwer ओपेन होत नाही.

  ReplyDelete
 66. सर शाळेचा लोगो गुनपत्रकाच्या समोरील बाजूवर येण्यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे.

  ReplyDelete
  Replies
  1. काही समस्या व त्यावरील उपाय: यामधील ५ वा मुद्दा वाचवा..

   Delete
 67. नमस्कार सर आपण cce चे जे सॉफ्टवेयर केले आहे त्यात सर्वात महत्वाची सुविधा जी मला कुठेही पाहायला मिळाली नाही जी की वर्णनात्मक नोंदी ड्रॉप डाऊन लिस्ट मध्ये येतात खूप छान सुविधा आहे
  पण मला एक अडचण येत आहे ड्रॉप डाऊन लिस्ट मधील नोंदी दिसत नाही फक्त ग्रीन पट्टी दिसते मी गेट्स फाईल करून सर्व क्रिया केल्या पण जमत नाही
  माझा pc ऑपरेटिंग 10 आहे व ऑफिस 13 मी वापरात आहे

  ReplyDelete
  Replies
  1. खूप धन्यवाद..!
   ड्रॉप डाऊन लिस्ट तयार करण्यासाठी सर्वांत महत्त्वाची बाब
   १) Export folder मध्ये दिलेली destdropdownlist_sample नावाची फाईल असावी.
   २) यानंतर सॉफ्टवेअर चालू करून get files बटनावर क्लिक करावे. यामुळे वरील फोल्डरमधील सर्व फाईल्सची यादी इम्पोर्टच्या ड्रॉप डाऊन लिस्ट मध्ये तयार होईल.
   ३) आता destdropdownlist_sample ही फाईल निवडा व समोरील डाऊन अरो की प्रेस करून नोंदी इम्पोर्ट करा.
   ४) नोंदी इम्पोर्ट होतील.
   ५) जर नोंदी इम्पोर्ट झाल्या नाहीत तर पुढील एक कारण असू शकते..
   ड्रॉप डाऊन लिस्टमध्ये कोणतीही नोंद अगोदर नसावी. असेल तर सर्व नोंदी डिलीट कराव्यात.
   आणि होम पेजवरील 'इयत्तावार वर्गीकृत नोंदी' याचा चेकमार्क काढलेला असावा.

   Delete
 68. प्रगती पत्रक चा दुसरा नमुन्याचा वापर कसा करावा.

  ReplyDelete
 69. जय महाराष्ट्र
  गोरे सर आपल्या software मध्ये मुलांचा आधार क्रमांक add करता येईल काय ? software खूपच छान आहे 2.06 कधी download साठी उपलब्ध होईल youtube वरील video त आहे.please reply

  ReplyDelete
 70. सर वर्ष २०१८-१९ हाईड आहे. बदलत नाही

  ReplyDelete
 71. very nice software and eagerly waiting for updated version for 2018-19

  ReplyDelete
 72. सर वर्ष २०१८-१९ हाईड आहे. बदलत नाही

  ReplyDelete
 73. sir cce 2.06 kadhi upalbadh hoil

  ReplyDelete
 74. गोरे सर, सन 2018-2019 कसे टाकावे?

  ReplyDelete
 75. आदरणीय सर वर्ष २०१८ -१९ कसे टाकता येईल याबद्दल मार्गदर्शन करावे.

  ReplyDelete
 76. सर आपण तयार केलेल्या सॉफ्टवेअर मुले खूपच मदत झाली आहे. सन २०१८-१९ ची अपडेट आल्यावर लवकरात लवकर कळवा .

  ReplyDelete
 77. खूप चांगले software आहे . आम्ही वापरतो. नवीन 2018-18 साठी update केव्हा येईल ?

  ReplyDelete
 78. गोरे सर,
  सप्रेम नमस्कार.
  मी मागील शैक्षणिक वर्षांत आपण तयार केलेले CCE सॉफ्टवेअर उपयोगात आणले होते.शिक्षकांसाठी सदर सॉफ्टवेअर अत्यंत उपयुक्त,वेळ व श्रम वाचवणारे आहे.सदर सॉफ्टवेअर तयार केल्याबद्दल आपले धन्यवाद.शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी सदर सॉफ्टवेअर चे update केव्हा येणार आहे, ते कृपया सांगा.
  धन्यवाद.....

  ReplyDelete
 79. CCE सॉफ्टवेअर खूप छान निर्मिती सर तुमचे अभिनंदन !!!!.

  ReplyDelete
 80. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी सदर सॉफ्टवेअर चे update केव्हा येणार आहे, ते कृपया सांगा.

  ReplyDelete