WHAT'S NEW?
Loading...

विंडोज 7 : आणखी आकर्षक पाच थीमचा शोध घेणे..

विंडोज 7 मध्ये काही थीम्स आपण ऑफलाईन शोधू शकतो. यासाठी खूप सोपी पद्धत आहे..

 



विंडोज 7 इंस्टॉल केल्यानंतर तुम्ही personalize मधून थीम निवडू शकता. विंडोजने अगोदरच आणखी काही थीम लपवून ठेवल्यात. त्या शोधण्यासाठी आणि इंस्टॉल करण्यासाठी पुढील कृती करा.

लपवलेली थीम अनलॉककरणे:




  1. तुमची विंडो ज्या ड्राईव्ह मध्ये आहे तो ड्राईव्ह सिलेक्ट करा. (C:)
  2. सर्चमध्ये लिहा. *.theme
  3. काही वेळात तुम्हाला एक मोठी यादी दिसेल. त्यातील ZA, US, GB, CA, AU या प्रत्येकी नावावर क्रमाने एकदा डबल क्लिक (अथवा राईट क्लिक करून ओपन) करा. तुमची थीम्स इंस्टॉल होतील.
  4. अथवा.. त्यातील प्रत्येक थीमला सिलेक्ट करा. खाली डावीकडे त्यातील Wallpaper दिसतील. जर ती इंस्टॉल नसेल तर इंस्टॉल करा.
  5. Desktop (right click) → Personalize मध्ये जाऊन चेक करा. सेट करा.
आता तुम्हाला डेस्कटॉपवर बदलेला मोसम दिसेल.

तुमची स्वतःची थीम तयार करणे:


  1. Desktop (right click) → Personalize → Desktop Background
  2. तुमची चित्रे / वालपेपर असणारा फोल्डर सिलेक्ट करा.
  3. त्यातील आवडणारी चित्रे सिलेक्ट करा.
  4. कोणत्याही क्रमाने ही चित्रे बदलण्यासाठी Shuffle ला चेकमार्क करा.
  5. आवश्यक वाटल्यास Timing सेट करा.
  6. Save Changes.
  7. Unsaved Themes नावाची एक थीम तयार झाली असेल त्यावर राईट क्लिक करून त्यास नाव देऊन सेव करा.


आणखी थीम्स हव्यात? Personalize मधील Get more theme Online ला क्लिक करा.

Thanks..

0 comments:

Post a Comment