WHAT'S NEW?
Loading...

Using Marathi Unicode in Photoshop



मित्रांनो,
आपणा सर्वांना युनिकोड फॉन्ट वापरणे सुलभ जाते. आज मी तुम्हाला फोटोशॉपमध्ये मराठी/हिंदी युनिकोड  फॉन्ट कसा वापरावयाची त्याची साधी/सोपी ट्रीक सांगणार आहे.
अडोबी फोटोशॉप हे फोटो एडिटिंग साठी एक उत्कृष्ट सॉफ्टवेअर आहे. यामध्ये युनिकोड फॉन्ट वापरताना जोडाक्षरे नीट दिसत नव्हती... पण आता तुम्ही सहज युनिकोड वापरू शकाल..

माझ्याकडे Photoshop CS6 Extended पोर्टेबल व्हर्जन आहे. त्यामध्ये मी खालीलप्रमाणे सेटिंग्ज केली आणि आता मराठी युनिकोड फॉन्ट सहज फोटोशोप मध्ये वापरता येत आहे..
Setting:

फोटोशॉप मध्ये युनिकोड वापरताना सर्वसामान्यपणे खालीलप्रमाणे फॉन्ट व्यवस्थित रेंडर होत नाहीत.

फोटोशॉप चालू करून Edit मेनुतून Preferences मधून Type मध्ये जा.

आता एक विंडो येईल त्यामध्ये Choose Text Engine Options मधील Middle Eastern हा ऑप्शन निवडा आणि फोटोशॉप बंद करून पुन्हा चालू करा.

आता नवीन फाईल घेऊन त्यात युनिकोड आणि अगदी जोडाक्षरेसुद्धा लिहू शकाल...


काही समस्या..
हा ऑप्शन आपल्या सॉफ्टवेअर मध्ये असणे गरजेचे आहे. जर दिसत नसेल तर आपल्याला फोटोशॉपचे व्हर्जन बदलावे लागेल किंवा नवीन फोटोशॉप इंस्टॉल करून घ्यावे लागेल. यासाठी आपणास ही लिंक देतो त्यावरून फोटोशॉपचे पोर्टेबल व्हर्जन डाऊनलोड करा. साईज फक्त 74 MB. काळजी करू नका हा व्हायरस नाही. ही झिप फाईल Extract करा. आणि सेटअप+की असा फोल्डर मिळेल. त्यातील here फोल्डर मध्ये जाऊन इंस्टॉल धीस ला क्लिक करून सॉफ्टवेअर इंस्टॉल करून घ्या. अॅक्टीवेशन साठी शेजारील नोटपॅड फाईल वापरा. हे पोर्टेबल सॉफ्टवेअर असल्याने आपल्याला डेस्कटॉप वर Shortcut तयार होणार नाही. किंवा कदाचित तुमच्या फोटोशोप फाईल डायरेक्ट यामध्ये ओपन होणार नाहीत. तेव्हा C ड्राईव्ह मधून Program Files {किंवा जर तुम्ही 64bit OS वापरत असाल तर Program Files (x86)} या फोल्डर मध्ये जा. येथे  Adobe Photoshop CS6 हा फोल्डर दिसेल. त्यातील Photoshop या अॅप्लिकेशनला राईट क्लिक करून  Create Shortcut ऑप्शन वापरून डेस्कटॉप वर Shortcut तयार करून घ्या. आता वरील कृती करून युनिकोड फॉन्ट Adobe Photoshop मध्ये वापरू शकता.

या सर्व कृतीचा व्हिडिओ पहा..
How to Enable UNICODE in Photoshop {Marathi Video}



Happy Designing..!!
आपला दिन शुभ असो..!!


6 comments: Leave Your Comments

  1. गोरे सर साॕफ्टवेअर अतिशय चांगले आहे .अशीच नव नवीन माहिती देण्यात यावी.अभिनंदन

    ReplyDelete
  2. अतिशय छान माहिती आहे सरजी

    ReplyDelete
  3. खरच खुपच सुंदर माहिती पोहोचवली जात आहे सर आपल्याकडुन ..... अभिनंदन

    ReplyDelete
  4. काही शब्द वेगेलच दिसतात जसा की फ्रेश हा शब्द.

    ReplyDelete
  5. सर, तुम्ही सांगितलेली settings करून सुद्धा मराठी मध्ये फॉन्ट आले नाहीत.

    ReplyDelete