WHAT'S NEW?
Loading...

Some Modified Unicode Fonts


मराठी भाषेतील काही अक्षरांत आपणास हवे तसे बदल हवे वाटतात पण; असे फॉन्ट मिळत नाहीत. काही ठराविक फॉन्ट आहेत पण त्याची फॉन्ट फेसेस योग्य दिसत नाहीत.

मी आपल्यासाठी म्हणजे मला तशी गरज वाटली म्हणून माझ्यासाठी बदल केले. बऱ्याच जणांनी अशी अक्षरे सॉफ्टवेअर मध्ये कशी लिहावयाची याची माहिती विचारली. पण युनिकोडच्या त्या फॉन्ट मध्ये अशी अक्षरे लिहताच येत नसल्याने असे बदल करण्याच्या प्रयत्न केला आहे.

अर्थात हा बदल नियमाला धरून नाही. म्हणजे कॉपीराईटचे उल्लंघन करणारच आहे. पण आपल्या मराठी बांधवांचे यातून काही हेतू साध्य होतील म्हणून हे फॉन्ट शेअर करत आहे. 

कोणती अक्षरे बदलली आहेत?

मराठी लेखनात काही जुन्या पद्धतीने लेखन होत होते. असे काही शब्द म्हणजे.-अश्विनी, विश्वास, प्रश्न, हल्ली, उद्गम कड्या, काठ्या सारखे शब्दातील अक्षरे नवीन पद्धतीने लिहण्याचा प्रयत्न केला आहे.


डाउनलोड लिंक 8/1/2021 पासून कार्यरत राहील..

अ. नं.फॉन्ट फॅमिलीडाऊनलोड लिंक
1UtsaahDownload
2KokilaDownload
3PoppinsDownload

फॉन्ट कसे इंस्टाल करावेत?

  • अगोदर इंस्टाल केलेले हे फॉन्ट सुरुवातीला संगणकातून काढून टाकावेत.
  • हे फॉन्ट विंडोज 10 मध्ये काढून टाकण्यासाठी खास वेगळी सोय दिली आहे. 
  • यानंतर हे फॉन्टवर डबल क्लिक करून install बटनावर क्लिक करून इंस्टाल करावेत.
  • किंवा एका वेळी सर्व फॉन्ट सिलेक्ट करून त्यावर राईट क्लिक करून सर्व फॉन्ट एका वेळी install all कमांड निवडावी.
  • काळजी म्हणून सुरुवातीला फक्त Utsaah फॉन्ट काढून ट्राय करावा. 
आपले अभिप्राय जरूर कळवावेत.
धन्यवाद!!

1 comment: Leave Your Comments

  1. मेडिकल प्रतिपूर्ती प्रस्ताव तयार करण्यासाठी काही सॉफ्ट वेअर उपलब्ध होईल का?
    कोविड काळात अनेक लोकांना उपयोगी पडेल.

    ReplyDelete