WHAT'S NEW?
Loading...

SVG line Animation

लाईन ॲनिमेशन:
ॲनिमेशन डोळ्यांना सुखद वाटते. पण असे ॲनिमेशन तयार करण्यास खूप त्रास घ्यावा लागतो. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हे ॲनिमेशन तयार करणार आहोत.

ही एक सोपी पद्धत आहे. कदाचित यापेक्षा वेगळ्या पद्धतीही आपणास माहिती असतील. PowerPoint च्या साह्याने असे ॲनिमेशन तयार करता येते पण ते तितकेसे प्रभावी वाटत नाही.
आवश्यक सॉफ्टवेअर :
हे ॲनिमेशन तयार करण्यासाठी
  • कोरल ड्रॉ
  • ऑनलाईन Vivus Instant Tool 
याचा वापर केल्यास चांगले ॲनिमेशन तयार होऊ शकेल.
कोरल ड्रॉ
कोरल ड्रॉ मध्ये फक्त लाईन च्या साह्याने drawing करून घ्या.
ही फाईल SVG या फाईल टाईपमध्ये सेव करा.
ऑनलाईन टूल:
  • Vivus Instant असा गुगलला सर्च द्या. आणि या साईटवर जा.
    https://maxwellito.github.io/vivus-instant/
  • या पेजच्या उजव्या बाजूला आपली SVG image ड्रॅग करा.
  • आणि Update बटन निवडा.
  • ॲनिमेशन तयार.
  • इतर सेटिंग्ज चेक करा.
वरील सर्व माहितीचा व्हिडीओ पाहावा..

मी काही ॲनिमेशन तयार करून त्यामध्ये इतर कोडींगचा वापर केला आहे ते आपण चेक करावे. हे ॲनिमेशन डाऊनलोड करण्यासाठी उजवीकडील Edit on Codepen वर क्लिक करावे आणि तळाच्या उजवीकडून हे Export करून डाऊनलोड करून आपल्या modern browser मध्ये पाहावे.
1) "भारत" या शब्दाचे सुंदर लाईन ॲनिमेशन ज्यामध्ये ग्लो व कलर या दोन्ही गोष्टी अधिकचे कोडींग करून तयार केल्या आहेत.
See the Pen BharatOneStrokeAnimatedGlow by Sanjay Gore (@SanjayGore) on CodePen.
2) स्वातंत्र्यदिन शुभेच्छा..!!
See the Pen IndependenceDayWish by Sanjay Gore (@SanjayGore) on CodePen.
तुमचा दिन शुभ असो..

6 comments: Leave Your Comments