WHAT'S NEW?
Loading...

Hyperlink in ms Word

मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये Hyperlink चा वापर करून document मधील पेजेसला अथवा बाहेरील फाईलला आपण लिंक देऊन document Interactive करू शकतो.
  • वर्डमध्ये blank document ने सुरुवात करा.
  • अगोदर सर्व टायपिंग करून घ्या. कोणतेही formatting करू नका.

  • सर्वात वर दोन तीन वेळा Enter की प्रेस करून रिकामी जागा तयार करा.

  • insert shapes मधून तुम्हाला आवडेल तो शेप insert करून घ्या.
  • त्यावर राईट क्लिक करून Edit text सिलेक्ट करून हवे ते लिहा. शक्यतो हे नाव म्हणजे प्रत्येक मुख्य मुद्दा असेल.
  • हवे असल्यास Format मधून शेपला हवा तो रंग निवडा. फॉन्ट योग्य असा करून घ्या.
  • येथे utsaah bold 26 अशी साईज वापरली आहे.
  • आता तो शेप कॉपी करून हव्या तेवढ्या वेळा पेस्ट करा येथे दोन वेळा पेस्ट केला आहे.

  • टायपिंग केलेला भागात आपण आता style चा वापर करणार आहोत. मुख्य टायटल सिलेक्ट करा आणि home मधील styles ग्रुपमधील title ला निवडा. त्या ओळीचा फॉन्ट मोठा झालेला दिसेल.
  • आता पहिले पान म्हणजे पहिला मुद्दा निवडून त्यास heading 1 निवडा.
  • दुसरे पान यासाठीही तीच style निवडा.
  • आणखी इतर मुद्दे असतील तर त्यास heading 1 निवडा.
  • उपमुद्दे असतील तर heading 2 निवडा.

  • आता तुम्ही प्रत्येक heading 1 मुद्द्याच्या अगोदर कर्सर नेऊन insert मेनूमधील pages ग्रुपमधील Page Break वर क्लिक करा. यामुळे प्रत्येक heading 1 नवीन पानावर जाईल.
  • आता आपण hyperlink करण्यास तयार आहोत.
  • insert केलेल्या पहिल्या शेपला राईट क्लिक करून hyperlink निवडा.

  • डावीकडील link to: मध्ये place in this ducument निवडा.
  • उजवीकडे फाईलमधील विविध headings दिसतील त्यापैकी पहिले heading निवडा.
  • ओके ला क्लिक करा.
  • या पद्धतीने आपण सर्व शेपना लिंक करून घ्या.
  • आता कोणत्याही शेपला कीबोर्डवरील Shift दाबून क्लिक केल्यावर त्या पानावर जाल.
  • आता जर पुन्हा top वर यायचे असेल तर प्रत्येक heading च्या पुढे शेप अथवा शब्द लिहून त्यास वरील पद्धतीने Top of the Document असे लिंक द्यावी लागेल. ती देऊन पहा. 

चला आपण interactive document तयार केले या प्रकारे आपण वेबपेज, चित्र, व्हिडीओ, नेटवरील एखादा वेबसाईट इत्यादीसाठी अशी लिंक देऊन आपले document किंवा वर्ड फाईल interactive करू शकतो.

0 comments:

Post a Comment