WHAT'S NEW?
Loading...

CCE 7.0 +

मूल्यमापन सॉफ्टवेअर वापरताना येणाऱ्या समस्यांचे समाधान करणारी प्रश्नावली.

CCE सॉफ्टवेअर काय आहे?

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठी लागणारे सर्व रिपोर्ट व कमी वेळेत आकर्षक निकाल तयार करणारे सॉफ्टवेअर आहे. यासाठी आपणाकडे मायक्रोसॉफ्ट एक्सेस व विंडोज 7 किंवा पुढील ओ.एस. असावी.

CCE सॉफ्टवेअरची वैशिष्ट्ये कोणती?

  • कमी वेळेत आकर्षक निकाल आणि खूप म्हणजे खूप काही..

डाउनलोड कसे करावे?

हे सॉफ्टवेअर http://www.curiosityworld.in/2018/08/cce-30.html ह्या साईटवर जाऊन डाउनलोड करता येईल.

अपडेट कसे करावे?

  1. 'डाऊनलोड इंस्टॉलर' ने सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे. 
  2. नवीन संगणकात Keep file, More info हे ऑप्शन निवडावे लागतात.
  3. अपडेट करण्यासाठी 'Just Update' ला क्लिक करावे.
  4. काम करत वा केले असल्याचे वर्ष व युडायस कोड निवडून सर्च करावे.
  5. नेक्स्ट करत फिनिश पर्यंत पोहोचा.
  6. सर्व बाबी व्यवस्थित झाले का ते शेवटी पहा.
  7. काही अडचण असल्यास याचा स्क्रीन शॉट घ्या व आम्हाला पाठवा.
  8. ही पद्धत न चालल्यास हा व्हिडीओ पहा.

सेटअप कसा करावा?

  1. प्रथमच सॉफ्टवेअर वापरणार असाल किंवा नवीन शाळेत प्रथमच सुरुवात करणार असाल तर 'डाऊनलोड इंस्टॉलर' ने सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे.
  2. NEW SETUP करा.
  3. Udise - येथे काही करण्याची गरज नाही.
  4. येथे शक्यतो दुसरा ऑप्शन निवडावा. अर्थात पहिला किंवा तिसराही चालेल.
  5. Install बटन निवडावे. शोर्टकट तयार करावे. 
  6. फिनिश करण्यापूर्वी सर्व बाबी व्यवस्थित सेट झाल्यात का याची खात्री करावी.
  7. फिनिश करताच सॉफ्टवेअर सुरु होईल.
  8. अन्यथा फिनिश विंडोचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवल्यास कमी वेळेत अडचण दूर करता येईल.
  9. वरील पद्धत न चालल्यास हा व्हिडीओ पहा.

एका वेळी अनेक युजर्सना हे सॉफ्टवेअर वापरता येईल का?

येईल पण काही मर्यादांचे पालन करावे लागेल.
  1. प्रत्येक पीसीवर एका वर्गशिक्षकाने आपली स्वतःच्या वर्गाची माहिती भरावी.
  2. कोणत्याही परिस्थितीत एकाच पीसीवर एका शाळेचे दोन किंवा अधिक ठिकाणाहून काम केलेस backup डेटा ओव्हरराईट होऊन backup मिळवणे अशक्य होते.
  3. यासाठी पुन्हा कोड घेण्याची आवश्यकता नाही. एकच कोड एका शाळेतील अनेक वापरकर्त्यांसाठी चालेल.
  4. वर्षाच्या शेवटी सर्व वर्गांचा डेटा एकत्र करावयाचा असल्यास नियंत्रित एक्स्पोर्ट मधून डेटा एक्स्पोर्ट करून तो एका वेगळ्या सॉफ्टवेअर मध्ये एकत्र करावा.

प्रिंट पेजवर ### असे दिसते आहे.

  1. सॉफ्टवेअर मधील font फोल्डर मधून utsaah चे चारही font इंस्टाल करून घ्यावे. 
  2. व सॉफ्टवेअर पुन्हा चालू करावे.
  3. किंवा हा व्हिडीओ पहा.

अक्षरे खूप मोठी दिसत आहेत.

  1. वरील कृती करावी..

पैसे कसे पाठवावे? गुगल फॉर्म कसा भरावा?

  1. होम पेजवर जाऊन नोंदवही किंवा खालील कोणत्याही टॅबला क्लिक करावे.
  2. Activate CCE ला क्लिक करावे.
  3. क्यू.आर. कोड स्कॅन करून पेमेंट करावे.
  4. हा स्क्रीनशॉट WhatsApp वर पाठवावा.
  5. किंवा ही माहिती गुगल फॉर्मद्वारे पाठवावी. Fill Google Form 
  6. कोड लगेच मिळण्यासाठी कॉल/मेसेज करावा.

मी फॉर्म मध्ये भरलेला डायस कोड व फोन नंबर सुरक्षित आहे काय?

हो निश्चितच!!
हा कोड आम्ही फक्त सॉफ्टवेअर क्टिवेशन साठी वापरत आहोत.
यापेक्षा दुसरा कोणताही हेतू नाही.

ॲक्टिवेशन कसे करावे?

  1. नोंदवही किंवा त्याखालील कोणत्याही टॅबला क्लिक करावे.
  2. Activate CCE ला क्लिक करावे.
  3. क्टिवेशन कोड WhatsApp द्वारे आपणास प्राप्त होईल.
  4. क्टिवेशन विंडो ओपन करावी आणि वर्ष व युडायस कोड चेक करावा.
  5. कॅपिटलमध्ये क्टिवेशन विंडोत कोड अचूक लिहा.
  6. Activate ला क्लिक करा. होम पेज ओपन होईल.
  7. असे न झाल्यास वर्ष, युडायस व कोड व मेसेजमधील वर्ष, युडायस व कोड चेक करावे.

प्रिंटींग कसे करावे?

  1. प्रिंट नोंदवही व प्रिंट निकाल यामधून प्रिंटींग किंवा PDF करता येईल.
  2. PDF करून प्रिंट क्वालिटी उत्कृष्ट मिळवता येईल.
  3. जो रिपोर्ट दिसतो त्यावर राईट क्लिक करावे.
  4. आता PDF किंवा प्रिंट साठी ऑप्शन येतील.
  5. या प्रिंट मधील सर्व पेजेस संख्या तळातील डावीकडील पाहता येतील. किंवा
  6. पेज अप / डाऊन कीबोर्डवरून सर्व पाने पाहता येतील.
  7. राईट क्लिक करून प्रिंट ऑप्शन निवडा.
  8. येथून आपला प्रिंटर निवडा.
  9. आवश्यक असल्यास फक्त हवे ते पान प्रिंट करण्यासाठी From  / To समोर योग्य संख्या लिहा.
  10. जसे फक्त पाचवे पान प्रिंट करण्यासाठी From: 5  | To: 5 असे लिहून प्रिंट द्या.

प्रिंटींग साठी थीम्स कशा सेट कराव्यात?

होम पेज मधील सेटिंग्ज टॅब मधून रिपोर्ट कलर थीम निवडा.

विषयांची नावे कशी बदलता येतील?

पायाभूत मधून विषय-लेबल ला क्लिक करावे.

विषय कसा वाढवता येईल?

  1. हे सेटिंग अगोदर करून दिले आहे.
  2. तरीही विषय वाढवणे आवश्यक असेल तर.. 
  3. पायाभूत मधून विषयनिश्चिती मध्ये जा.
  4. येथून इयत्ता व त्यातील विषय दिसतील येथून तुम्ही विषय वाढवू किंवा कमी करता येतील.
  5. कोणतीही माहिती भरण्यापूर्वी हे सेटिंग्ज बदलावे लागेल.
  6. आकारिक-संकलित साठी सुरुवातीचे सहा विषय आहेत.
  7. फक्त आकारिक विषय संख्या शेवटचे तीन विषय आहेत.
  8. नऊ पेक्षा जास्त विषय घेता येत नाहीत.

एनेबल कंटेंट का करावा लागतो आहे?

  1. ही मायक्रोसॉफ्टची सुरक्षितता आहे.
  2. विघ्नसंतुष्टी इंजिनीअर व्हायरस तयार करतात. 
  3. व्हायरस एक प्रकारचे सॉफ्टवेअरच असते फक्त ते नुकसान करते. त्रास देते.
  4. त्यांच्या अशा प्रकारची फाईल किंवा सॉफ्टवेअर आपल्या संगणकात व्हायरसचे काम करू शकतात. 
  5. यामुळे फाईल किंवा सॉफ्टवेअर बनवणारा आपल्या परिचयाचा असेल तर आपण एनेबल कंटेंट करू शकता. 
  6. आपण आमच्यावर निश्चित विश्वास ठेवून एनेबल कंटेंट करावा.

प.अ. विषयासाठी गुण ६०-४० असे करता येतील काय?

नाही.

पेजसाईज बदलली गेली आहे.

  1. रिपोर्ट ओपन करून त्यावर राईट क्लिक करून पेज-सेटअप मध्ये जा.
  2. पेज A4 आहे का खात्री करावी.
  3. दुसरे असे की कदाचित आपल्या प्रिंटरला A5 पेज साईज सपोर्ट करत नसेल.
  4. कोणत्याही वेळी आपण पीडीएफ करून कोठेही प्रिंट करता येईल.

प.अ.1/२ विषयासाठी गुण 100-100 असे करता येतील काय?

  1. होय. 
  2. पायाभूत → विषय निश्चिती मधून त्या इयत्तेसाठी विषय वाढवा.
  3. सत्र, इयत्ता, तुकडी निवडून
  4. या विषयासाठी भारांशनिश्चिती करा.

CCE मध्ये माहिती कोणत्या क्रमाने भरावी?

मदत टॅबमध्ये सर्व बाबी दिल्या आहेत. कामाचा फ्लो चार्ट व क्विक लिंक येथे दिल्या आहेत.

पायाभूत माहिती कशी भरावी?

हा व्हिडीओ पाहावा. व्हिडिओ पहा.

विद्यार्थी यादी कशी भरावी?

  1. व्हिडीओ पहा. किंवा
  2. होम पेजवरून सत्र, इयत्ता व तुकडी निवडा.
  3. रिफ्रेश करा.
  4. माहिती भरा tab मधून विद्यार्थी यादी भरा वर जा.
  5. येथे विद्यार्थी यादी भरा.
  6. इयत्ता व तुकडी याची खात्री करा.
  7. सत्र एक व दोनसाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र रोल नंबर ठेवता येतील.
  8. एखादा विद्यार्थी त्या सत्रात नसेल तर तो बॉक्स रिकामा ठेवावा.
  9. रोल नंबर डबल होऊ नये किंवा स्किप होऊ नये असे झाल्यास रिपोर्ट हवा तसा येणार नाही.
संकलित/आकारिक गुणनोंद कशी करावी ?

  1. सत्र, इयत्ता, तुकडी व विषय निवडा.
  2. रिफ्रेश करा.
  3. अगोदर भारांश गुण निश्चिती करा.
  4. विद्यार्थी भरली नसेल तर भरावी.
  5. सत्र एक किंवा दोन असेल तर रोल नंबर निश्चिती करा.
  6. या नंतर विद्यार्थी यादी गुणनोंदीला जोडा.
  7. आता सर्व विद्यार्थी यादीला जोडले जातील मेसेज आला तर ओके करा.
  8. आता गुण भरावेत.
  9. प्रत्येक विषयासाठी ६ ते ८ प्रमाणे कृती करावी.
  10. भरलेल्या माहितीचा प्रोग्रेस बार प्रोग्रेसबार मध्ये पहावयास मिळेल.

वर्णनात्मक नोंदी कशा कराव्यात?

  1. Dropdown द्वारे नोंदी निवडता येतील.
  2. नोंद बदलता येईल.
  3. स्त्री पुरुष उजवीकडे तळाला दिले आहे त्याचा वापर मुलीच्या नोंदीसाठी करता येईल.

भारांश निश्चिती कशी करावी?

  1. व्हिडीओ पहा.
  2. होम पेजवरून सत्र, इयत्ता व तुकडी निवडा.
  3. रिफ्रेश करा.
  4. पायाभूत माहिती मधून भारांश गुण निश्चिती मध्ये जा.
  5. दिसत असलेले गुण बदला विषय तेच ठेवा.
  6. बेरीज योग्य आली का पहा. चुकीची येत असल्यास रेड सिग्नल दिसेल.
  7. विंडो क्लोज करा. डेटा सेव होईल.

माझ्या स्वतःच्या नोंदी कशा इम्पोर्ट कराव्यात?

  1. सर्व नोंदी डिलीट करा.
  2. sample नोंदी ची एक्सेल फाईल अपडेट करा.
  3. ही फाईल इम्पोर्ट करा.

स्वतःच्या नोंदी का लिहल्या जात नाहीत?

असे झाल्यास ती विंडो क्लोज करा. व पुन्हा चालू करून मराठी टाइपिंग करा. dropdown निवडल्यास गुगल इनपुट टूल काम करत नाही. असे का होते ते कळत नाही. पण विंडो बंद करून पुन्हा सुरु केल्यास मराठी टाइपिंग करता येईल.

मराठी टायपिंग कसे करावे?

मराठी टायपिंगसाठी तुम्ही ही साईट पहावी.. https://www.uttampatil.in/2018/08/google-indic-input.html

प्रकल्पासाठी गुण कसे द्यावेत?

  1. प्रकल्पासाठी गुण ठेवताना OR ला चेकमार्क करा.
  2. प्रकल्प साठी ऑर तंत्र निश्चित करा.
  3. दोन्ही तंत्रांना समान गुण द्या.
  4. विद्यार्थ्यांना अकारिक गुण देताना ऑर तंत्रापैकी कोणत्याही एकाच तंत्रासाठी गुण द्या.

विद्यार्थी ड्रॉपडाऊन मध्ये येत नाहीत.

  1. इयत्ता व तुकडी चुकीची निवडली असेल.
  2. भरलेले विद्यार्थी चुकीच्या इयत्तेत / तुकडीत गेले असतील.
  3. संगणक स्लो असेल तर कृपया थोडी प्रतीक्षा करावी.

गतवर्षीचे विद्यार्थी कसे इम्पोर्ट करावेत?

यासाठी हा व्हिडीओ पाहावा. Watch Video How To Import Old Data

एका सॉफ्टवेअर मधील माहिती दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये कशी घेता येईल?

यासाठी इम्पोर्ट / एक्स्पोर्ट सुविधा वापरावी लागेल.

शाळेचा लोगो, विद्यार्थी फोटो, तुकडीचा ग्रुपफोटो कसे जोडावेत?

  1. नोंदी मधून फोटो निवडा फॉर्म ओपन करावा.
  2. फॉर्मवरील सूचना वाचून फोटो ब्राउज करून निवडा.

पीडीएफ ऑप्शन ऑन नाही.

Font फोल्डर मधील Save As PDF and Xps सॉफ्टवेअर इंस्टाल करून सॉफ्टवेअर पुन्हा चालू करावे.

पीडीएफ करण्याच्या पद्धती.

  1. SAVE AS PDF करून किंवा
  2. PRINT ऑप्शन मधून पीडीएफ करता येईल.

सॉफ्टवेअर पेनड्राईव्ह मध्ये नेता येईल काय?

होय सर्व फोल्डर कॉपी करून नेता येईल. दुसऱ्या पीसीवर font व मायक्रोसॉफ्ट access आवश्यक असेल.

पेनड्राईव्ह मधून काम करता येईल का?

  1. हो! पण पेनड्राईव्हमध्ये डेटा रीड व राईट करण्यास वेळ लागतो.
  2. सॉफ्टवेअर किंवा डेटा लवकर करप्ट होण्याची शक्यता असते.
  3. सॉफ्टवेअर चा वरचे वर backup घ्यावा.
  4. पेनड्राईव्ह प्रत्येक वेळी Safely Remove करावे.

पेनड्राईव्हशिवाय डेटा इकडून तिकडे कसा अपडेट करता येईल?

  1. हो यासाठी Dropbox किंवा Drive चा वापर करता येईल.
  2. दोहोंपैकी एक दोन्ही पीसीला इंस्टाल करून घ्या.
  3. दोन पिसिमधील Dropbox किंवा Drive एकाच खात्याद्वारे कार्यान्वित (Activate) करावे.
  4. यामुळे आपल्या संगणकात एक Dropbox किंवा Drive चा फोल्डर तयार होईल.
  5. यामध्ये सॉफ्टवेअर ठेवा.
  6. काम पूर्ण करून नेट चालू करा.
  7. Sync होऊन फोल्डर ग्रीन सिग्नल दाखवेपर्यंत थांबा. वा इतर काम करा.
  8. आता दुसऱ्या पिसितील नेट चालू करा.
  9. Sync होऊ द्या.
  10. आता कामाला सुरुवात करावी.
  11. सॉफ्टवेअर सुरु करण्यापूर्वी व बंद केल्यानंतर Synchronize करणे आवश्यक आहे.

युजरनेम व पासवर्ड कसे बदलावेत?

गरज नाही.

सॉफ्टवेअर सुरु का होत नाही?

  1. संगणकात मायक्रोसॉफ्ट access नसणे.
  2. एनेबल कंटेंट न करणे. 

भरलेला डेटा सुरक्षित आहे का?

  1. हो.
  2. गरज वाटल्यास backup घ्या किंवा पूर्ण फोल्डर पेनड्राईव्ह, गुगल ड्राईव्हला ठेवावे.

फोटो फोल्डर सापडत नाही.

सपोर्ट करणारे सर्व फोल्डर शेजारी पेस्ट करा. जसे photo, img, font etc.

मी सॉफ्टवेअर बाजूला घेऊन माहिती भरली आता काय करावे?

सपोर्ट करणारे सर्व फोल्डर शेजारी पेस्ट करा. जसे photo, img, font etc.

भरलेला डेटा का निघून का जातोय?

  1. भरलेला डेटा निघून जात नाहीच! 
  2. आपण सॉफ्टवेअर नव्याने इंस्टाल करून घेत आहात.
  3. असे केले तरीही आपणास पूर्वी भरलेला डेटा मिळू शकतो. 

डेटा वा बकअप केव्हा मिळत नाही.

  1. सॉफ्टवेअर पूर्णपणे ऑफलाईन आहे.
  2. तुमचा डेटा आमच्याकडे मुळीच नसतो.
  3. पीसी फॉरमट केला तर डेटा मिळण्याची शक्यता संपते.
  4. आपण आपले डॉक्युमेंट फोल्डर स्वतःहून डिलीट वा रिकामे केले तर रिकव्हर डेटा होत नाही.
  5. पीसी पूर्णपणे रिसेट केला.
  6. वरील प्रसंगी आम्ही डेटा मिळवून देऊ शकत नाही. आपणाकडे बकअप कॉपी असेल तर शक्य आहे.

सॉफ्टवेअर ॲक्टिवेशन का निघून गेले?

यासाठी वरील कारण कारणीभूत आहे.

सॉफ्टवेअर करप्ट का होत आहे? सॉफ्टवेअर करप्ट झाले आता काय करावे? 

  1. सॉफ्टवेअर सुरु असताना त्याची प्रोसेस चालू असताना अचानक बंद झाले तर असे होते.
  2. यासाठी 'व्हायरस व लाईट जाणे' अशी मुख्य कारणे आहे.
  3. करप्ट झाल्यास सॉफ्टवेअर अपडेट करावे.

सॉफ्टवेअर सुरु करताना आता एरर येत आहे?

  1. यात गतवर्षीपेक्षा जास्त कोडींग आहे. 
  2. काही कोडींग आपल्या संगणकातील VBA च्या व्हर्जनला जुळत नाही.
  3. हा सॉफ्टवेअर चा एरर नसून आपल्या संगणकातील वेगळ्या सेटिंग्जमुळे होत आहे.
  4. उपाय:
    1. दोन ऑफिस असतील तर एकच वापरणे.
    2. ऑफिसचे वेगळे व्हर्जन वापरणे.
    3. Activate नसणारे ऑफिस काढणे. (नवीन laptop, विंडोज 10)
    4. पीसी format करणे.
  5. इत्यादी उपाय आहेत.
  6. संपर्क करावा.

विद्यार्थी चुकून दुसऱ्या तुकडीत गेला आहे.

  1. विद्यार्थी इतर माहिती भरण्यापूर्वी असे झाल्यास बदल करता येईल.
  2. यासाठी इयत्ता वर्ष अपग्रेड मध्ये जाऊन तेथून इयत्ता व तुकडी बदलून घ्यावी.
  3. माहिती भरण्यापूर्वी काळजी घ्यावी.





7 comments: Leave Your Comments

  1. मराठी टायपिंग कसे करावे?

    ReplyDelete
  2. sir school logo कसा add करायचा

    ReplyDelete
  3. सर मला सातारा जिल्हा परीषदेचा लोगो बदलायचा आहे तो बदल कसा करावा

    ReplyDelete
  4. वर्ष बदलायचा आहे २०१९-२०. होत नाही

    ReplyDelete
  5. कॉलम व रो चे साइज कसे वाढवावे कारण प्रिंट करताना काही मुलांचे आडनाव दिसत नाही.

    ReplyDelete
  6. pdf madhye kase karave .right click kelyanantar save as oftionvar pdf hot nahi

    ReplyDelete
  7. एका सत्राचे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या सत्रात एका तुकडीचे विद्यार्थी दोन तुकड्यात विभागता येतील का?

    ReplyDelete