पावरपॉइंट मध्ये इमेजची बॅकग्राउंड सहज सोप्या पद्धतीने रिमुव्ह करता येते.
ती इमेज आपण PNG स्वरुपात सेव करू शकतो.
सॉफ्टवेअर : मायक्रोसॉफ्ट ऑफिस - वर्ड / पावरपॉइंट / एक्सेल
पद्धत :
नमुन्यासाठी एखादी इमेज घ्या.
त्याची पार्श्वभूमी पांढरी अथवा वेगळ्या रंगाची असली तरी चालेल.
- इमेजवर डबलक्लिक करा. Format मेनू दिसेल.
- या मेनुच्या डावीकडील Remove Background वर क्लिक करा.
- आता सिलेक्शन Adjust करा.
- हवा असणारा एखादा भाग लाल होत असल्यास Mark Areas to keep वर क्लिक करा.
- आता पेन्सिलसारखे टूल येईल. त्याने जो भाग ठेवायचा आहे त्या भागावर क्लिक करा.
- नको असणारा भाग दिसत असल्यास Mark Areas to Remove वर क्लिक करून काढून टाकावयाच्या भागावर पेन्सिलने क्लिक करा.
- तुम्हास हवे तसे बदल झाले असल्यास Keep Changes वर क्लिक करा.
- छान..! तुमची इमेजची पार्श्वभूमी पारदर्शी झाली असेल.
वरील इमेजेस ह्या ऑफिस २०१३ मधील आहेत. त्या अगोदरच्या व्हर्जनमधेही उपयोगी पडतील.
ऑफीसमधील आपल्या डॉक्युमेंट मध्ये आकर्षक स्मार्ट आर्ट / फ्लो चार्ट कसे वापराल? अवश्य वाचा.
0 comments:
Post a Comment