WHAT'S NEW?
Loading...

Word, Excel, PowerPoint मधून टेक्स्ट अर्धवर्तुळाकार कसे कराल?


मायक्रोसॉफ्टच्या पावरपॉइंट, एक्सेल वा वर्ड हे कमी वेळात चांगले ग्राफिक्स, चित्रे, लोगो तयार करायला खुप फायदेशीर आहे.


आज यातील टेक्स्ट Format मधील Text Effect ऑप्शन थोडक्यात नजर टाकूयात.


 1. टेक्स्ट बॉक्स insert करा. त्यात शाळेचे नाव लिहा.

 2. त्याचे सिलेक्शन कायम ठेवत Format मेनूत जा.

 3. WordArt Styles ग्रुपमधून → Text Effect निवडा.
 4. आता माऊस Pointer → Transform वर न्या. उजवीकडे एक बॉक्स अवतरेल. त्यामध्ये विविध प्रकार दिसतील.
 5. अर्धवर्तुळ :
  Wrap → Arch Up वर क्लिक करा.
  Format मेनुतूनच उजवीकडील साईज Width व Height समान करा. (5).
  आवश्यकता वाटल्यास फॉन्ट साईज / फॉन्ट बदला.
  छोटा गुलाबी बॉक्सने अक्षर व आकार अर्धवर्तुळ होईपर्यत Adjustment करा.

 6. गावाचे नाव खालच्या ओळीत घेण्यासाठी :
  Format → Text Effect → Transform → Button वर जा.
  होम मेनुतून टेक्स्ट alignment center करा.
  शाळेच्या नावाआधी इंटर अथवा शिफ्ट इंटर करा.
छान...! तुमचे टेक्स्ट ग्राफिक्स डिझाईन तयार...!


आकर्षक स्मार्ट आर्ट तयार कशी करावीत त्यासाठी हे एकदा वाचाच.

0 comments:

Post a Comment