WHAT'S NEW?
Loading...

PowerPoint / Word / Excel मधून आकर्षक Smart Art (फ्लो चार्ट) कसे तयार करावेत?


पावरपॉइंट मध्ये फ्लो चार्ट व रेडीमेड ग्राफिक्ससाठी खूप साऱ्या सोई आहेत.
त्याबद्दल मायकोसॉफ्टचे धन्यवाद..!
आपण क्षणात चांगल्या प्रकारचे फ्लो चार्ट, शब्दांचे तयार नमुने,
विविध आकार यांचे रेडीमेड ग्राफिक्स अगदी सहज वापरू शकतो.

चला पाहूया कसे ते?

आवश्यक सॉफ्टवेअर : MS Office 2007 +
येथील स्क्रीन शॉट 2013 मधील आहेत.

 
 1. Insert मेनूतून Illustrations ग्रुपमधील
 2. Smart Art वर क्लिक करा.
 3. तुमच्यासमोर एक विंडो येईल त्यामध्ये अनेक प्रकारचे स्मार्ट आर्ट ग्राफिक्स नमुने दिसतील. येथे नमुन्यासाठी Hierarchy मधील पहिला मुद्दा निवडला.
 4. (आपल्या घटक | कंटेंटला अनुसरून एक ग्राफिक्स निवडा.)
 5. एक विंडो ओपन झाली असेल.
 6. Type Your Text Here मधील सर्व डेटा डिलीट करा.
 7. परिसरातील घटक मुख्य मुद्दा लिहला.
 8. उपमुद्दा लिहिताना Enter व Tab की दाबा. (सजीव)
 9. त्यातील उपमुद्दा लिहिताना पुन्हा Enter व Tab की दाबा. (प्राणी)
 10. Enter करून त्यातील दुसरा उपमुद्दा लिहिला. (वनस्पती)
 11. निर्जीव हा उपमुद्दा आहे त्यामुळे येथे Backspace की दाबा.
 12. तुमची tree diagram तयार झाली.
 13. Design मेनुतून Change Color निवडा व कलर बदला.
 14. सर्व स्मार्ट आर्ट सिलेक्ट करून फॉन्ट बदला. (ऑप्शनल)
 15. एखाद्या मुद्द्याचा चौकोनाची (वनस्पतीची) जागा बदलावयाची असल्यास तो सिलेक्ट करून योग्य त्या ठिकाणी न्या.
सुंदर...! तुमची आकर्षक आकृती तयार...!

आणखी काही नमुने पहा.

पोस्ट वाचली, आवडली? धन्यवाद...! काही अडचण असल्यास प्रतिक्रिया द्या....
 

3 comments: Leave Your Comments

 1. Very nice friend presentations
  Very very nice

  ReplyDelete
 2. खूप छान आणि सुंदर माहितीचा खजिना....

  ReplyDelete