आकर्षक आणि प्रोफेशनल स्लाईड शो साठी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणेगरजेचेआहे.
प्रथम खालील गोष्टी माहिती करून घ्या.
- थीम्स आणि त्यातील विविधता. (Themes and Variants)
- Transition आणि Animation काय आहे?
- Insert मेनुतील विविध ऑब्जेक्ट:
चित्रे, आकार, स्मार्ट आर्ट, चार्ट, लिंक, सिम्बॉल, ऑडीओ, व्हिडीओ - Format : Picture Tool, Drawing Tool
स्लाईड शो मध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात. |
थीम्स | टेम्प्लेट :
- स्वतःचे टेम्प्लेट तयार करून ते स्लाईड शोला वापरावायची पद्धत वापरल्यास कमी वेळात आकर्षक स्लाईड शो तयार होतील. कसे ही पोस्ट वाचा.
- आकर्षक ग्राफिक्स निवडा आणि ग्राफिक्सचा अतिरेक टाळा.
- बॅकग्राउंड तुमच्या कंटेंट अनुसार घ्या. ती Textured करा. आकर्षक वाटेल.
- स्लाईड मास्टर मधून सुरुवातीसच Color, Font, तुमचा एखादा लोगो टाकून घ्या.
ग्राफिक्स | फॉन्ट :
- बॅकग्राउंड कलर व फॉन्ट कलर लगेच वेगळे दिसावेत.
- शक्यतो थीम कलर निवडा. त्यामुळे थीम बदलली की स्लाईडचे रुपडे बदलेल.
- फॉन्ट दोन ते तीनच वापरा. त्यांचा एकमेकाशी संबंध असावा. (मराठीसाठी थीम फॉन्ट बदला. )
- चित्रे परिचयाची असावीत.
- रंग निवडण्यासाठी Eyedropper चा वापर करा.
- शेप्स, स्मार्ट आर्ट, आलेख इत्यादी बाबींचा वापर स्लाईड मध्ये करावा.
चित्रे :
- इमेजेसना बॅकग्राउंड असेल तर ती काढून टाका. कसे? ही पोस्ट वाचा.
- इमेज हव्या त्या आकारात कापा (Cropping) त्याला इफेक्ट द्या. चित्र, आकार यांची मांडणी करताना Format मधील Align, Size Tool वापरा.
- आकडेवारीत माहिती देण्याऐवजी चार्ट / आलेख तयार करून वापरा.
ऑडीओ | व्हिडीओ :
- आपल्या स्लाईडमध्ये ऑडीओ व व्हिडीओ insert करा. यामुळे स्लाईड रन होताना पाहणारे दंग होतील.
- इतर ठिकाणी जाताना स्लाईडचे व्हिडीओत रुपांतर करून जवळ ठेवा.
मजकूर | मांडणी | वेळ :
- अगोदर कंटेंट चे नियोजन करा. कच्ची मांडणी करा.
- मांडणी साधी असावी. खूप गोष्टी एका वेळी नकोत.
- एका स्लाईडमध्ये एकच मुद्दा निवडा.
- स्लाईड : दहा, वेळ: कमाल वीस मिनिटे, फॉन्टसाईज तीस पेक्षा जास्त असावी.
- येथे दिलेल्या गोष्टी सर्व एकाच स्लाईडमध्ये ठेऊ नये त्याचे नियोजन हवे.
अॅनिमेशन :
- स्लाईड Transition इफेक्ट निवडा. तसेच दोन ते तीनच इफेक्ट निवडा व तेच प्रत्येक स्लाईडवर वापरा प्रोफेशनल लुक येईल.
- शब्द ओळी यांना विवध इफेक्ट दिल्याने ते लवकर वाचता येत नाहीत हे लक्षात ठेवा. त्यामुळे साधे animation वापरा.
- स्लाईड अशा तयार करा त्या बोलल्या पाहिजेत.
आणखी :
- Macro ची माहिती करून घ्या.
- लिंक कशी वापरावी?
- स्लाईड टाईमिंग, Narration इत्यादी.
- कस्टम स्लाईड शो.
- कॉपी पेस्ट करण्यापेक्षा स्लाईड डूब्लीकेट करावी. इफेक्ट कायम राहतात. आणि कमी वेळात जास्त काम होते.
माझे योगदान:
मी तयार केलेली काही प्रेझेन्टेशन काही दिवसात येथे डाऊनलोडसाठी ठेवण्याचा प्रयत्न करेन.
काही वैशिष्टे:
- Simple Animation.
- Macro Included Slides.
- Interactive Slides.
0 comments:
Post a Comment