WHAT'S NEW?
Loading...

500 GB ची हार्ड डिस्क 465 GB ची का दाखवते?


हार्ड डिस्क तयार करणाऱ्या कंपन्या ह्या
1GB = 1,000,000,000

1GB = 10 चा 9 वा घात
500GB = 500,000,000,000
असे प्रमाण मानून हार्ड डिस्क तयार करतात.


पण ऑपरेटिंग सिस्टीम / संगणक मात्र हे गणन
दोन ला पाया समजून गणन करते.
1KB = 1024 B = 210 (Bytes)
1MB = 1024 KB = 220 (Bytes)
1GB = 1024 MB = 230 (Bytes)

1GB = 1,073,741,824 Bytes
1GB = 2 चा 30 वा घात Bytes
500GB = 536,870,912,000 Bytes

परिणामी  संगणकाचे
500 GB = 536,870,912,000 Bytes
आणि उत्पादकाचे
500 GB = 500,000,000,000 Bytes

हा फरक सर्वसाधारण 35 GB असल्याने
आपली हार्ड डिस्क 465 GB च्या आसपास दाखवते.
संगणक असे गणन करेल
500,000,000,000 B / 1,073,741,824 = 465.6612873 GB

ऑपरेटिंग सिस्टीमचाही हे गणन करताना थोडाफार परिणाम या तफावतीवर होतो.

याशिवाय हार्ड डिस्कचे formatting (NTFS, FAT32) कोणते आहे यावरही थोडेफार अवलंबून असू शकते.

उत्पादक अगदी तंतोतंत 500,000,000,000 Bytes ची हार्ड डिस्क बनवेल कशावरून माझ्याकडील पोर्टेबल हार्ड डिस्क (FAT32) पहिली असता 499,983,122,432 Bytes ची आहे. 16,877,568 Bytes कमी म्हणजे 16MB कमी.

याप्रमाणे गणन केल्यास साधारण आपल्या हार्ड डिस्क अशा स्पेस दाखवतील.
उत्पादक  संगणक स्पेस
 1 GB 931.32 MB
 2 GB 1.86 GB
 4 GB 3.73 GB
 8 GB 7.45 GB
16 GB 14.90 GB
32 GB 29.80 GB
64 GB 59.60 GB
500 GB 465.66 GB
1 TB 931.32 GB

0 comments:

Post a Comment