WHAT'S NEW?
Loading...

कमी वेळात फक्त हव्या असणाऱ्या फाईल्सना कसे शोधावे?


एखाद्या फोल्डर मध्ये विविध प्रकारच्या भरपूर फाईल्स असतील आणि आपणास हव्या असणाऱ्या फाईल्स कमी वेळात कशी शोधावी त्यासाठी या टिप्स तुमच्या निश्चित उपयोगी पडतील.
चला तर मग तुमच्या संगणकाला कामाला लावा.
ही पद्धत फोल्डर शोधण्यासही उपयोगी पडते.

खालील सर्व मुद्दे आपणास Windows Explorer मध्ये करता येतात.

फाईलचे नाव माहित असेल तर :

या ठिकाणी फाईलचे नाव टाईप करा.
संगणक तुम्हाला तुमची फाईल शोधून देईल.

सुरुवातीचे काही अक्षरे माहित असल्यास :

फाईलचे पूर्ण नाव आठवत नाही फक्त सुरुवातीची काही अक्षरे क्रमान आठवत असतील तर असा सर्च द्या.
{ xyz ही तुम्हास आठवणारी अक्षरे आहेत असे मानून}
xyz* (सुरुवातीची अक्षरे xyz व नंतरची अक्षरे माहित नाहीत म्हणून * लिहा.

फाईलची कोणतीही क्रमाने आठवणारी अक्षरे :

प्रथम * व त्यापुढे xyz व त्यापुढे *         जसे→  *xyz* अथवा *xyz*.*

फाईल किती अक्षरातील आहे हे पक्के माहित आहे पण एकही अक्षर आठवत नाही :
(अंक वा अक्षरे यास मिळून length म्हणू.)
  • पाच length ची फाईल शोधण्यास ?????.* असे लिहा.
  • पाच अक्षरातील दुसरे अक्षर माहित असल्यास असे लिहा. ?y???.*
  • ab अक्षरे असणाऱ्या mp3 फाईल्स शोधण्यासाठी *ab*.mp3 असे लिहा.

एकाच प्रकारच्या सर्व फाईल्स शोधणे :

सर्व mp3 शोधण्यासाठी *.mp3
या पद्धतीने काही फाईल प्रकार शोधण्यास पुढील तक्ता उपयोगी पडेल.
कोणतीही फाईल ओळखण्यासाठी त्या फाईलला एक्श्टेंशन हे नावापुढे डॉट (.) देऊन दिले जाते.
अ.नं.फाईल प्रकारएक्सटेन्शन स्पष्टीकरण
1 MS Word doc | docx .. 2003 पर्यंत .doc; पुढे .docx
2 MS Excel xls | xlsx | xlsm .. ‘’
3 MS PowerPoint ppt | pptx | ppts | pptm .. ‘’
4 इमेज फाईल्स jpg | jpeg | png | gif | bmp हे कॉमन प्रकार आहेत.
5 ऑडीओ wav | mp3 .. ‘’
6 व्हिडीओ vob | avi | mp4 | .. ‘’
7 कोरल ड्रॉ cdr -
8 फोटोशॉप psd -
9 पीडीएफ pdf -
10 टेक्स्ट फाईल txt -
असे बरेच प्रकार आहेत वरील प्रकार कॉमन आहेत.

फाईलचे एक्श्टेंशन पाहण्यासाठी त्यावर राईट क्लिक करून properties मधून type of file पाहावे.

वरील पद्धतीने कोणत्याही फाईल्स पहावयाच्या असतील तर *.(एक्श्टेंशन) असा सर्च द्यावा.
जसे एका फोल्डरमधील फक्त वर्डच्या सर्व फाईल्स पाहण्यासाठी *.docx असा सर्च द्या.

फाईलचे वर्गीकरण (Sort by) व गट करणे (Group by) :
आपल्याला हवी असणारी फाईल शोधण्यास ह्या दोन कमांड उपयोगी पडतात.
याचे आणखी उपप्रकार आहेत. ते जसे जसे ह्या पद्धती वापरू तसे तसे त्यांचा अभ्यास होईल.
या दोन्हीमध्ये सारखेच ऑप्शन आहेत. ते वाढवता येतात.
आपणास जर docx फिईल्स पहावयाच्या असतील तर...

विंडोज Explorer मध्ये उजवीकडील रिकाम्या जागेत राईट क्लिक करून..
  • Sort by → Type असे केल्यास लवकर शोधता येईल. 

  • Group by → Type केल्यास फाईल प्रकारानुसार ग्रुप तयार होतील आणि त्यामधून फाईल शोधणे सोपे जाईल.
अनुभवाने शोध पटकन कसा घ्यावा ते समजते. त्यासाठी अनुभव घेण्यास सुरुवात करा.
धन्यवाद...!

0 comments:

Post a Comment