
पावरपॉइंट मधून पीपीटी सरळ व्हिडिओत रुपांतरीत करू शकतो. या सुविधेचे खूप फायदे आहेत. कमी वेळात व्हिडीओ तयार, मोबाईलवर, टीव्हीवर पाहता येईल.
आवश्यक सॉफ्टवेअर :
- MS Office 2013 किंवा 2010
- मागील व्हर्जन मधून व्हिडीओ तयार करताना थर्ड पार्टी plugin लागतील.
- अथवा स्क्रीन रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर वापरावे लागेल.
- जर तुमच्याकडे MS Office 2010 किंवा 2013 असेल तर तुम्ही हे सहज करू शकता.
- ह्या पायऱ्या MS Office 2013 मधील आहेत. पण थोड्याफार फरकाने त्या 2010 लाही लागू पडतात.
- प्रथम तुमचा सर्व स्लाईड शो तयार करून घ्या.
- ऑडीओ, व्हिडीओ स्लाईडमध्ये insert केले असतील तर तेसुध्दा या व्हिडिओमध्ये एकजीव होतील.
- व्हिडीओ तयार एकदा slide show रन करा. सर्व योग्य पद्धतीने आहे याची खात्री करून घ्या.

- फाईल मेनूवर क्लिक करून Export कमांड वर क्लिक करा.
- उजवीकडील मेनू दिसतील त्यातून Create a Video हा पर्याय निवडा.
- आणखी उजवीकडे आणखी ऑप्शन दिसतील योग्य क्वालिटी* निवडा.
*येथे तुम्हास नेमका व्हिडीओ कोठे वापरावयाचा आहे त्यानुसार ऑप्शन निवडा.
(927 x 720 | 648 x 480 | 324 x 240 - supported resolution) - स्लाईडसाठी किती सेकंद वेळ द्यायचा ते Seconds spent on each slide च्या समोरून निवडा.
- शेवटी Create Video वर क्लिक करा.
- आता फाईल सेव करण्याचे लोकेशन निवडा. या व्हिडीओ फाईलला योग्य नाव द्या.
- Save बटन क्लिक करून काही वेळ प्रतीक्षा करा. Status-bar वरील प्रोग्रेस पहा. तुमचा व्हिडीओ तयार...!
- या पद्धतीने तुम्ही .mp4 | .wmv अशा प्रकारात व्हिडीओ तयार करू शकता.
सर power point मधुन video तयार करतांना त्यात mp3 song गाणे back ground sound
ReplyDeleteकशी Add करावी