WHAT'S NEW?
Loading...

पावरपॉइंट : स्वतःचे वेगळे आकार - मनोवेधक ग्राफिक्स


फोटोशॉप, कोरल ड्रॉ सारख्या सॉफ्टवेअर सारखे कस्टम शेप तयार करून ग्राफिक्स तयार कसे करावे याबद्दल माहिती घेऊया.




वरील चित्रातील काही इमेज पहा. पावरपॉइंट मधे तयार केलेल्या ग्राफिक्स विश्वास नाही बसत? चला तर पाहूया कसे ते?
सुरुवात Blank Slide ने करूया.


  1. Insert > Shapes मधून एक वर्तुळ Shift की प्रेस करत काढा. (Height / Width – 5cm)
    Rounded Rectangle काढा. (Height-3.5cm, Width-7cm)
  2. दोन्ही शेप shift की दाबून सिलेक्ट करा.
  3. Drawing Tools | Format मेनुतून → Align Center व Align Middle करा.


  4. तुमचा स्वतःचा आकार Custom Shape तयार करण्यासाठी  Drawing Tools | Format मेनुतून → Merge Shapes→ Union निवडा. (शेपचा रंग बदलून घेतला आहे.)

  5. Drawing Tools | Format → Shape Effects → Bevel → Hard Edge.
    आता तुमच्या आकाराला त्रिमिती भास तयार झाला असेल.
  6. तुमच्या Shape वर राईट क्लिक → Add Text करून त्यात ‘Curiosity World’ लिहा. (Font-Size: 36)
  7. Format → WordArt Style > Fill-…, Inner Shadow निवडा. (येथे Fill – Gray-25%, Background 2, Inner Shadow येथे इनर शेडो महत्वाची आहे.)


  8. आता बॅकग्राउंड व टेक्स्ट कलर महत्त्वाचे आहेत. बॅकग्राउंड कलर जो आहे त्याच्या डार्क शेड टेक्स्टला वापरावी म्हणजे खरा परिणाम जाणवतो. तुम्ही वेगळे प्रयोग करून पाहू शकता.

    Format → Text Fill → बॅकग्राउंड कलर पेक्षा डार्क शेड निवडा.
    (माझे मत : theme colour वापरा > याचे फायदे थीम बदलली की रंग बदलतात Try करा.)

    उत्तम...! तुमचे स्वतःचे ग्राफिक्स तयार.

आता थोडे रंगांशी खेळा.... पहा खालील नमुने..


असे प्रयोग मी CorelDraw मधे करत होतो. तेच पावरपॉइंट मध्ये पहिले पटकन होतात. आणि कमी वेळात.. तेथे थीम कलर बदलता येत नाहीत. येथे रंगांशी खेळता येते. पण तुम्हाला खरेच खूप वेगळे, आकर्षक शेप तयार करायचे असतील तर तुम्हाला CorelDraw, Illustrator, फोटोइफेक्टसाठी Photoshop वापरावे लागेल. तेथील Resolution Quality आपणास manage करता येते. व आणखी बरेच काही..!

हेच शेप तुम्ही इमेज मध्ये कन्व्हर्ट करू शकता कसे ते वाचा येथून...

रंग ही गोष्ट इतकी महत्वाची आहे त्याबद्दल मी लवकरच लिहणार आहे. तेव्हा भेट देत राहा. आपल्याला ही माहिती कशी वाटली तेही लिहा. Thanks…

2 comments: Leave Your Comments