WHAT'S NEW?
Loading...

Blogger: Static & Dynamic Pages

ब्लॉग तयार करताना Static आणि Dynamic या दोन्ही प्रकारच्या Pages उपयोग चांगल्या पद्धतीने करता येतो. हे दोन्ही पेजेस विषयी आपल्याला माहिती असल्यास त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करता येईल.
Static Pages ची संख्या ब्लॉगरमध्ये मर्यादित आहे. Dynamic Pages ना मात्र मर्यादा नाही.

Static Pages:

My blogs मधून Pages मधे जाऊन New Page मधून आपणास नवीन Static Page add करता येते. हे पेज आपणाला स्वतःहून तयार करावे लागते आणि त्यातील बदलही... अशी पेजेस आपल्या ब्लॉगमध्ये आपण पूर्वी add केली असतीलही.

Dynamic Pages:

अशी पेजेस ब्लॉगवरील पब्लिश केलेल्या पोस्टवरून तयार करता येतात अथवा होतात. यासाठी कोणतीही पोस्ट पब्लिश करताना त्यास Label देणे गरजेचे आहे.
s2gsoftware.in
पब्लिश केलेल्या पोस्टला नंतरही लेबल देऊ शकतो. एकाच पोस्टला लेबल संख्या एकापेक्षा देता येते. असे असले तरी त्यांची संख्याही मर्यादित असावी. आपली पोस्ट ज्या संदर्भाने असेल त्या अनुषंगाने लेबल द्यावीत. लेबल एका शब्दाची असल्यास फायदेशीर ठरतात. लेबलमधे Capitalization चा विचार ही पुढे योग्य ठरतो.
www.s2gsoftware.in
जसे – आपल्या पोस्टला जर Word, Excel, PowerPoint अशी लेबल्स दिली तर फक्त Word च्या पोस्ट्स filter व sort करून जे पेज तयार होते ते असते Dynamic Page!

Home वर क्लिक केल्यावर दिसणारा ब्लॉग..
http://s2gblogdemo.blogspot.in/

Excel लेबल असणाऱ्या सर्व पोस्ट सर्च करून तयार होणारे Dynamic Page या लिंकद्वारे तयार होईल.
http://s2gblogdemo.blogspot.in/search/label/excel

How to create Dynamic Page link?

Dynamic Page ची लिंक तयार करणे सोपे आहे.
Manual Method:
  1. http://s2gblogdemo.blogspot.in तुमच्या ब्लॉगचा अड्रेस लिहा.
  2. पुढे /search/label/ लिहा.
  3. शेवटी तुमचे सर्च करावयाचे लेबल (स्पेलिंग अचूक) लिहा. excel
  4. तुमची लिंक काहीशी अशी असेल. (No Space)
    http://s2gblogdemo.blogspot.in/search/label/excel
From Blog View:
  1. तयार लिंक मिळवण्यासाठी तुमच्या ब्लॉगचा view पहा त्यातील कोणत्याही Labels च्या पुढील तुम्ही दिलेल्या लेबलवर जाऊन राईट क्लिक करा आणि लिंक लोकेशन कॉपी करा. हवी तेथे पेस्ट करून पहा.
  2. अथवा लेबल वर क्लिक करा आणि तुमच्या browser चा अड्रेस पहा.
ही माहिती आपणास निश्चित उपयोगी पडेल.
या पद्धतीने मेनूबार मध्येही या Dynamic Page ची link देऊ शकता. मेनूबार तयार करू शकता. अधिक माहिती पुढच्या पोस्टमध्ये पाहूया..
ब्लॉग संदर्भात यापूर्वी अनेक पोस्ट पब्लिश केल्या आहेत. त्या आपण वाचल्या नसतील तर वाचाव्यात..

0 comments:

Post a Comment