WHAT'S NEW?
Loading...

एक्सेल: दिनांकावरून महिना व वार मराठीत करण्याचे सूत्र

एक्सेलमध्ये मराठीत वाराचे नाव आणि महिन्याचे नाव सूत्राच्या सहाय्याने येण्यासाठी दोन तीन सूत्रांची मांडणी एकत्र करावी लागते.
 1. A स्तंभात अ. नं. लिहले.
 2. B स्तंभात दिनांक लिहले.
 3. C स्तंभात डावीकडील दिनांकाचा वार मराठीत येण्यासाठी पुढीलप्रमाणे सूत्र लिहा.
  =INDEX({"सोमवार","मंगळवार","बुधवार","गुरुवार","शुक्रवार","शनिवार","रविवार"},WEEKDAY(B2,2))
 4. वारांची नावे जर रविवारपासून लिहली तर सूत्रात थोडा बदल होईल..
  =INDEX({"रविवार","सोमवार","मंगळवार","बुधवार","गुरुवार","शुक्रवार","शनिवार"},WEEKDAY(B2))
 5. D स्तंभात दिनांकाचा महिना मराठीत येण्यासाठी..
  =INDEX({"जानेवारी","फेब्रुवारी","मार्च","एप्रिल","मे","जून","जुलै","ऑगस्ट","सप्टेंबर","ऑक्टोबर",
  "नोव्हेंबर","डिसेंबर"},MONTH(B2))
 6. आता तुम्ही B2 सेलमधील दिनांक बदलली तर वार व महिन्याचे मराठीतील नाव बदलेल.
 7. E स्तंभात आणखी विस्तारित पूर्ण मराठीत दिनांक लिहला आहे.
  =CONCATENATE(DAY(B2),"  ",INDEX({"जानेवारी","फेब्रुवारी","मार्च","एप्रिल","मे","जून",
  "जुलै","ऑगस्ट","सप्टेंबर","ऑक्टोबर","नोव्हेंबर","डिसेंबर"},MONTH(B2))," ",YEAR(B2)) 
ही एक्सेल फाईल डाऊनलोड करून पहा. (File Size : 12 KB, Type: xlsx, Excel 2007 & above, Created in Excel 2013)
धन्यवाद...!
आणखी काही माहिती हवी असल्यास कमेंट लिहा.
तुमचा दिवस शुभ असो..

16 comments: Leave Your Comments

 1. गोरे सर महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपले कार्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षकांना मार्गदर्शन मिळते आहे अशीच माहिती देत रहा

  ReplyDelete
  Replies
  1. नीलकंठ सर, धन्यवाद..! आपला स्नेह व प्रेरणा अशीच राहूद्या.

   Delete
 2. Replies
  1. Pankaj Sir, I feel glad that this info liked you...

   Delete
 3. छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद सर.

  ReplyDelete
  Replies
  1. कुंडलिक सर, माहिती आपणास उपयोगी वाटली धन्यवाद..!

   Delete
 4. गोरे सर् नमस्कार
  आपण दिलेली माहिती खूप उपयोगी आहे अगदी सहज सोप्या भाषेत आपण माहिती समजून सांगितली आहे.आम्हाला शाळेत नवीन उपक्रम राबविताना याचा खूप उपयोग होणार आहे.आपल्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा

  ReplyDelete
  Replies
  1. सरजी नमस्ते,
   मला नेहमी वाटायचे की आपण लिहलेली माहिती सहज व सोपी आहे का? आपल्या या पुष्टीमुळे मला आनंद झाला आपण सोप्या भाषेत लिहू शकतो. आपल्या शुभेच्छासाठी खूप आभार..!

   Delete
 5. स्तुत्य कार्य

  ReplyDelete
 6. एखाद्या वर्कशीट च्या सेल मध्ये एखादा नंबर टाकून इतर वर्कशीट वरील त्या नंबर संबंधित पूर्ण माहिती आपल्यास मिळते याचे सूत्र आपण सांगाल का ? मला माझ्या जि प शाळेचे जनरल रजि बनवायचे आहे. माझे असे उद्दिष्ट आहे की एखाद्या व्यक्ती चे नाव टाकल्यावर त्याचा रजि क्र. मिळवा व त्या क्र. वरून त्याचे बोनाफाईड वा शाळा सोडल्याचा दाखला मिळवा.

  ReplyDelete
 7. मिळवा ऐवजी मिळावा असे वाचा

  ReplyDelete
 8. एक्सेल मध्ये Add In(कोडिंग) कसे तयार करायचे त्याचे विश्लेषण द्या.
  आपले मनापासुन धन्यवाद खूप छान ब्लॉग आहे आणि व्हिडीओ ही खूप सुंदर

  ReplyDelete
 9. कुठचं उपयोगी माहिती आहे सर!

  ReplyDelete
 10. FILE DOWNLLOAD HOT NAHI

  ReplyDelete