WHAT'S NEW?
Loading...
HTML: Hyperlinking
HTML मध्ये लिंकिंगच्या विविध पद्धती समजून घेऊया. यामध्ये दुसऱ्या वेबपेज अथवा फाईलला लिंक देणे. किंवा त्याच डॉक्युमेंट मधील घटकाला लिंक देणे. इमेजला लिंक देणे असे प्रकार गरजेनुसार आपण वापरू शकतो.
दुसऱ्या वेबपेजला लिंक देऊन ते पेज ओपन करण्यासाठी पुढील कोड वापरावा.
Example:
Click Here to go on PAGE 1
चित्रावर क्लिक करून लिंक देण्यासाठी..
Example:
त्याच वेबपेजवरील एखाद्या भागावर / मुद्द्यावर जाण्यासाठी पुढील क्रमाने जा.
प्रथम ज्या मुद्द्यावर जायचे आहे त्याला id द्या.
जसे-
This is Important paragraph.
आता जेथून हा मुद्दा लिंक करावयाचा आहे तेथे जा. आणि पुढीलप्रमाणे लिहा.
Go to Imp Para
आता तुम्ही जर Go to Imp Para वर क्लिक केले तर त्या आयडीच्या para वर जाल.
Browser मध्ये एक स्टेप Back जायचे असेल तर...
Go Back
किंवा
Go Back One Step
अथवा Javascript चे वेगळे function वापरून असे लिहावे.
Go Back With Function
<javascript>
function goback(){window.history.back();}
</javascript>
या पद्धतीने लिंक करून तयार केलेली नमुना वेब फाईल पाहण्यासाठी येथे क्लिक करून डाऊनलोड करून टेस्ट करा.
(File Size: 7 KB, File Type: ZIP, Created for Non IE Browsers)
Happy coding..!
3 comments: Leave Your Comments