WHAT'S NEW?
Loading...

Lock Cells or Protect Worksheet


मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील सेल्स लॉक केल्यामुळे त्या शीटमधील सूत्रे बदलली जाणार नाहीत. ज्या सेलमधील किंमती एडीट करावयाच्या असतील त्या तेवढ्या बदलण्यासाठी खुल्या ठेऊ शकतो. यामुळे चुकूनही सूत्रे लिहलेली सेल सिलेक्ट होऊन त्यातील सूत्र बदलले जाणार नाही.
 1. सुरुवातीस तुमचे शीट तयार करून घ्या.


 2. ज्या सेलमधील किंमती वारंवार बदलावयाच्या असतील त्या सेल सिलेक्ट करा.
 3. जर सेल अनियमित क्रमाने असतील तर सेल सिलेक्ट करताना Ctrl बटणाचा वापर करा.
 4. सिलेक्ट केलेल्या सेलला राईट क्लिक करून Format cells निवडा


 5. Protection टॅब मध्ये जाऊन Locked चा चेकमार्क काढा आणि OK निवडा.
 6. Review मेनुतून Protect Sheet निवडा.
 7. Select Locked Cells चा चेकमार्क काढा. Select unlocked cells ला चेकमार्क राहूद्या.
 8. आवश्यक वाटल्यास पासवर्ड टाका. ओके करा. फाईल सेव करा.
तुमचे वर्कशीट प्रोटेक्ट झाले आहे. आता तुम्ही सूत्रे लिहिलेली अथवा इतर सेल्स सिलेक्ट करू शकत नाही.
प्रोटेक्शन आणि पासवर्ड देऊन अशी फाईल तुम्ही इतरांना देऊ शकता.

ही फाईल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
(File Size: 10.7KB, File Type:xlsx, Created in Excel 2013, Works on Excel 2007 and above)

Have a nice time..


9 comments: Leave Your Comments

 1. महिती छान आहे नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या

  ReplyDelete
  Replies
  1. मिलिंद सर, धन्यवाद.
   अनेक उपयुक्त माहिती पोस्ट करण्याचा प्रयत्न राहील.

   Delete
  2. फारच छान माहिती आहे सर नवीन काहीतरी शिकायला मिळाले

   Delete
  3. दिलीप सर नमस्ते आणि धन्यवाद..!
   शालेय वा इतर कामकाजात उपयोगी पडेल असे देण्याचा मानस नेहमीच राहील.

   Delete
  4. संजय सर नवीन शिकायला मिळाले
   धन्यवाद

   Delete
 2. student name, category, birthdate, age are written in excel.
  i want to extract the total row with student name, category, birthdate, age...
  example- below age 3
  or below age 6
  or by category
  or by birthdate before 01 jan, 2010


  Can we make special list with formula

  ReplyDelete
  Replies
  1. Sorry too Late... Haven't seen your post.
   Use Filter and Copy it to other sheet..
   or other way
   you have to use VBA.
   using it you can do anything in excel..

   Delete
 3. सर, आपल्या या उपक्रमाचा फायदा आमच्या सारख्या नवशिक्या व्यक्तींना होतो त्याबाबत आपले आभार !
  कृपया आपण excel sheet मधील vlookup व Hlookup हा formula कसा वापरावा ते सविस्तर सांगा.....सदैव ऋणी राहील.

  ReplyDelete
  Replies
  1. प्रफुल सर धन्यवाद..!
   या तिन्ही सूत्रांची माहिती लवकरच पोस्ट करण्याचा प्रयत्न करतो.
   गुगल प्ले स्टोअर वर S2G Excel Fx या नावाने सर्च केल्यास एक ॲप या संदर्भाने तयार केले आहे. कदाचित आपणास त्याचा उपयोग होईल. हे ॲप पूर्णतः मराठीत आहे.
   S2G Excel Fx

   Delete