
CCE चे 2020-21 चे 5.1.18 अपडेट !
कॉपी -पेस्ट अपडेट, मागील सॉफ्टवेअर मधून डेटा इम्पोर्ट, अनेक वर्षांचा निकाल आता एकाच सॉफ्टवेअर मध्ये..!!
CCE 5.1.18 - 2020-21 सॉफ्टवेअर लिंक !!.
18-1-2021 6:00 AM | Ver 5.1.18 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस मध्ये तयार केलेले एक युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर वापरून सहज व सोप्या पद्धतीने निकाल तयार करता येईल.अ. नं. | सॉफ्टवेअर माहिती | डाऊनलोड लिंक |
---|---|---|
1 | CCE 5.1.18 पूर्ण पॅकेज | Download |
2 | CCE 5.1.18 फक्त अपडेट | Download |
अपडेट कसे करावे?
- आपल्या जुन्या CCE 5.0 फोल्डर मधील फक्त CCE_5.0_Application / CCE_5.0_Application_64 च्या जागी किंवा शेजारी या अपडेट केलेल्या CCE_5.1_Application / CCE_5.1_Application_64 चे सॉफ्टवेअर ठेवा व अपडेट केलेल्या सॉफ्टवेअर मध्ये काम सुरु करावे.
- शक्यतो डाउनलोड फोल्डर मधेच काम सुरु करू नये.
- तयार होणारा फोल्डर हा c ड्राईव्ह सोडून इतर ठिकाणी ठेवावा व काम सुरु करावे.
- सॉफ्टवेअर अपडेट करताना पूर्वीच्या सॉफ्टवेअर फोल्डर मध्येच Download update extract करून ठेवावे. यामुळे डेटा इम्पोर्ट एक्स्पोर्ट किंवा अॅक्टिवेशन इतर कोणतीही बाब बदलावी लागत नाही.
गेल्या वर्षीचा सर्व डेटा कसा इम्पोर्ट करावा?
- कोणत्याही एका वर्षासाठी सॉफ्टवेअर ॲक्टिवेट करावे.
- इम्पोर्ट एक्स्पोर्ट टॅब मधून सर्वात वरील इम्पोर्ट डेटा बटन निवडा.
- ओपेन फाईल डायलॉग मधून जुने CCE 4.x सॉफ्टवेअर निवडा.
- युडायस दोन्ही मॅच आहेत का पहा.
- इम्पोर्ट करण्यापूर्वी सर्व डेटा पहाता येतो. तो डेटा पहावा.
- सर्व डेटा इम्पोर्ट करा बटन निवडा.
- वरील बॉक्समध्ये किती व कोणते रेकॉर्ड इम्पोर्ट झाले त्याची संख्या दाखवली जाईल.
- ह्या फॉर्म खाली विद्यार्थी संख्या दर्शवली जाईल. त्यावरू खात्री करू शकता रेकॉर्ड इम्पोर्ट झाली किंवा नाही.
- सर्व रेकॉर्ड अॅक्टिवेशन कोड सहित इम्पोर्ट झाले असेल.
- पायाभूत माहितीमधून फक्त शिक्षक माहिती माहिती व तुकड्यांचे लेबल योग्य असल्याची खात्री करावी.
- विद्यार्थी फोटो या वर्षात घेण्यासाठी योग्य त्या वर्षाच्या फोल्डर मध्ये ठेवावेत.
- वर्ष बदलून रिफ्रेश करून डेटा चेक करता येईल.
- वरील पद्धतीने फक्त विद्यार्थीसुद्धा इम्पोर्ट करता येतील.
विद्यार्थी पुढील वर्षात कसे घ्यावेत?
विद्यार्थी पुढील वर्षात प्रमोट करण्यासाठी दोन पद्धती आहेत.
जर अगोदरच गेल्या वर्षीचे विद्यार्थी इम्पोर्ट केले असतील तर..
- इम्पोर्ट एक्स्पोर्ट टॅब मध्ये जा.
- इयत्ता वर्ष अपग्रेड बटन निवडा.
- गतवर्षीचे साल, इयत्ता व तुकडी योग्य निवडा.
- शो रेकॉर्ड ला क्लिक करावे.
- त्या तुकडीतील विद्यार्थी दिसू लागतील.
- खाली या वर्षीचे वर्ष हिरवे झाले असेल आता फक्त या विद्यार्थ्यांची या वर्षाची इयत्ता व तुकडी निवडावी.
- खाली विद्यार्थी निवडलेल्या इयत्तेत प्रमोट करा यास क्लिक करावे.
- विद्यार्थी प्रमोट होतील.
- एका वेळी एकच इयत्ता प्रमोट होऊ शकते.
जर विद्यार्थी अगोदर इम्पोर्ट केले नसतील तर..
- इम्पोर्ट एक्स्पोर्ट टॅब मध्ये जा.
- पहिल्या बॉक्समधून वर्गोन्नती डेटा बटन निवडा..
- गतवर्षीचे सॉफ्टवेअर निवडा.
- युडायस एक आहेत का याची खात्री करावी.
- ड्रोपडाऊन यादीतून विद्यार्थी यादी निवडा.
- इयत्ता व तुकडी निवडून रेकॉर्ड पहा निवडा.
- आता हे विद्यार्थी पुढील वर्गात प्रमोट करण्यासाठी उजवीकडील विंडो मधून पुढील वर्ग निवडा. वर्ष योग्य निवडा.
- वर्गोन्नती डेटा पहा
- डेटा योग्य असल्यास तो डेटा सेव करा.
- खालील विद्यार्थी संख्या बदलेल विदार्थी किती इम्पोर्ट झाले त्याचा मेसेज सुध्दा येईल.
अपडेट समस्या व उपाय?
एकाच शाळेचा अनेक पीसीमधील डेटा इम्पोर्ट कसा करावा?
CCE 5.1 ची नवीन वैशिष्टे
- सॉफ्टवेअर अपग्रेड करताना इम्पोर्ट एक्स्पोर्टची गरज नाही.!
- एका क्लिकवर अपग्रेट होणारे सॉफ्टवेअर
- एका क्लीकमध्ये गतवर्षीचे विद्यार्थी इम्पोर्ट करता येतात.
- विद्यार्थी संचायी नोंदपत्रक (एका वर्षाचे)
- नवीन 4.0 होम पेज आणि 10 थीम्स
- कॉफी व्हर्जन एकदा Activate केल्यास कोणत्याही पीसीवर चालू शकते.
- विषयशिक्षकांसाठी विविध तक्ते (हायस्कूलसाठी जास्त उपयुक्त)
- एका क्लिकवर अपग्रेड
- १९ रंगसंगतीत रिपोर्ट्स प्रिंटींग
- प्रगती पत्रकांचे विविध 7 नमुने
- मागील कोणत्याही CCE सॉफ्टवेअर मधील डेटा इम्पोर्ट करून वर्गोन्नती एका क्लिकवर
- नियंत्रित डेटा एक्सेलमध्ये एक्स्पोर्ट करता येतो.
- आकर्षक प्रोग्रेसबार
- कामाचा फ्लोचार्ट
- अधिक सुविधा देणारे कॉफी एडिशन
- इयत्ता १ ते ८ वी साठी प्रत्येकी नऊ तुकड्याची कमाल मर्यादा.
- विद्यार्थीसंख्येला मर्यादा नाही.
- विद्यार्थी संख्येनुसार स्वयंरचना करणारे पहिलेच सॉफ्टवेअर..
- परीक्षा नंबर किंवा रोल नंबर वापरून रिझल्ट !!
- सर्व वार्षिक तक्ते एका छताखाली
- एका क्लिकवर PDF
हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी काय आवश्यक आहे?
- मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे 2007, 2010, 2013, (2016 मध्ये इमेज दिसत नाहीत)
- वरील व्हर्जन नसेल तर Access runtime environment 2007
- किंवा पुढील व्हर्जन ( प्रोफेशनल )
- युनिकोड फॉन्ट आवश्यक
- सोबत Utsaah हा फॉन्ट दिला आहे..
हे सॉफ्टवेअर कसे मिळवता येईल?
- हे सॉफ्टवेअर 150/- रुपयात एका वर्षाचा निकाल तयार करण्यासाठी वापरता येईल. तथापि केलेला निकाल केव्हाही पाहता येईल.
- BHIM, PhonePe, Google Pay यासारखी UPI App वापरून हा कोड स्कॅन करून सुलभरीत्या पेमेंट करता येते.
Scan to Support with Rs. 150/-* - या वर्षाचा अॅक्टिवेशन कोड मिळण्यासाठी हा गुगल फॉर्म भरावा.
- गुगल फॉर्म भरण्यापूर्वी पैसे पाठवल्याचा रेफरन्स नंबर आवश्यक आहे.
- गुगल फॉर्म भरल्याने कोड लवकर मोबाईलद्वारे टेक्स्ट किंवा WhatsApp ला पाठवता येतो.
CCE 5.1 मदत:
- CCE च्या कोणत्याही मदतीसाठी, ट्रिक्स आणि सततच्या अपडेट्ससाठी Telegram वरील ह्या ग्रुपला जॉईन व्हा. Join CCE Help Group
- (English version is available now Thanks for visiting..!)
Thanks!! Have a nice day!
If you like share this with your friends..Subscribe and support me!
very nicely constructed software, SALUTE.
ReplyDeleteSir good job.very useful for all teachers.....Keep it up ur good work....
ReplyDeleteThanks sirjii
ReplyDeleteThanks sir
ReplyDeleteThanks sir
ReplyDeleteआपण तयार केलेली सर्व सॉफ्टवेअर खुप सुंदर,छान वर्णन उपयुक्त आहेत. खास करून आपले सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अॅप तर खुपच सुंदर व उपयुक्त.....
सर!.. याच डाटाबेस वर जर केंद्र स्तरावरील माहितीचे संकलन करण्यासाठी एखादे अॅप्लीकेशन तयार व्हावे अशी अपेक्षा.🙏
सर महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांसाठी आपण केलेल्या मेहनतीला सलाम
ReplyDeleteअतिशय उपयुक्त सॉफ्टवेअर
खूप खूप आभार
Nice sir
ReplyDeletegood work sir!!!!
ReplyDeleteखूप छान सर आपले श्रम सर्वांच्या फायद्याचे आहेत.खूप लोकांचे ब्लेसिंग आपल्या मिळतात.
ReplyDeleteसर आपले काम अतिशय छान आहे.
ReplyDeleteसर मासिक पत्रक ,शालेय पोषण आहार मासिक रिपोर्ट, उपस्थिती भत्ता अश्या मासिक अहवालासाठी एकच सॉफ्टवेर तयार करावे व ते पैसे घेऊन दिले तरी चालेल आपले काम खूप चांगले आहे.
सर खूप छान आहे.
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDeleteसर कॉफ्फी वर्जन च्या बाबतीत अधिक माहिती Youtube वर Upload करा.
ReplyDeleteअवश्य सर, धन्यवाद!!
Deletevery nice sirji बहुत दिनो से इस software का इंतजार कर रहा था धन्यवाद सरजी
ReplyDeleteअतिशय उपयुक्त सॉफ्टवेअर आहे.
ReplyDeleteगोरे सर आपले मनःपूर्वक आभार
11वी 12 वी चा पण निकाल तयार होतो का
ReplyDeleteनाही सर, फक्त 1 ते 8 साठी
Deleteअप्रतिम प्रेरणादायी कार्य गुरु !!!
ReplyDeleteVery nice sit
ReplyDeletesir this software is very useful for every techno savy teacher......thanks once again.....and best wishesh for u r bright future
ReplyDeleteअतिशय उपयुक्त सॉफ्टवेअर आहे.
ReplyDeleteगोरे सर आपले मनःपूर्वक आभार
Nice cce app software...I.Like it..
ReplyDeleteउपयुक्त आहे.... या वर्षी नक्की वापरणार
ReplyDeleteभारांश निश्चित करताना परिसर अभ्यास विषय दिसत नाही
ReplyDeleteइयत्ता व तुकडी निवडून रिफ्रेश केल्यावर dropdown मध्ये विषयांची नावे बदलतात. त्या इयत्तेस तो विषय असेल तर निश्चित दिसेल. तिसरी ते पाचवीसाठी हा विषय दिसेल.
Deleteमा गोरे सर आपण खूप सुंदर काम करीत आहात.आपल्या software मुळे महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधवांचे कष्ट, वेळ यांची बचत होत आहे.
ReplyDeleteCCE 3.0 सॉफ्टवेअर ला जनरल रजिस्टर सॉफ्टवेअर व संचिका जोडली तर बरं होईल.
अगदी बरोबर सर, जनरल रजिस्टर सोफ्टवेअर + CCE 4.1 व संचिका जोडली तर फारच परिपूर्ण सोफ्टवेअर तयार होईल सरजी...
Deleteमा संजयजी गोरे सर आपण करत असलेले कार्य खूप महान असून ते शिक्षकाला एक विशिष्ट उंचीवर नेत आहे. आपल्या कार्यामुळे शिक्षकाचे परिश्रम व वेळ याची मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे.
ReplyDeleteCCE 3.0 या सॉफ्टवेअर ला आपले जनरल रजिस्टर व संचिका या दोन सुविधा जोडल्या तर आणखी बरे होईल.
अवश्य प्रयत्न करेन धन्यवाद सरजी
DeleteNot open in my phone
ReplyDeleteHow I open it
ReplyDeletehow i make paiment using net banking
ReplyDeleteyour ac name does not match
मोबाईल मध्ये कार्य करत नाही
Deleteपेमेंट अँप वापरल्यास सुलभ होईल
Super...sir
ReplyDeleteSuper...sir
ReplyDeleteअतिशय सुरेख, उपयुक्त,वेळ वाचवणारे प्रभावी सॉफ्टवेअर....Thanks Gore sir for new updated cce software...
ReplyDeleteधन्यवाद सर
DeleteAwesome Sir
ReplyDeletePlz Provide CCE 3.0 Software In ENGLISH and
Std.9 Evaluation Software early as Possible Thanking You
गोरे सर कृपया विंडोज 10 साठी सपोर्टिव लिंक दया
ReplyDeleteAccess असल्यास विंडोज 10 मध्येही चालते
DeleteSuper...sir
ReplyDeleteSIR मी CCE 3.0 Software इन्स्टाल केले पण दर वेळी शेवटी ENABLE CONTENT येते .असे का
ReplyDeleteकारण तुम्ही ऍक्सेस 2007 वापरत आहात.
DeleteAccess चालू करा.
Blank database निवडा.
ऑफिस बटन वरून aceess option वर जा.
Trust center मधून trust center setting वर क्लिक करा.
Trusted location निवडा.
Add new location ला क्लिक करून
browse द्वारे तुमच्या cce सॉफ्टवेअर चे लोकेशन निवडा
ओके करा,
आता तुम्हाला पुन्हा हे सॉफ्टवेअर असे एनेबल कंटेंट विषयी मेसेज दाखवणार नाही.
coffee edition म्हणजे काय कृपया माहिती द्यावी
ReplyDeleteकॉफी एडिशनची काही ठळक वैशिष्टे:
Delete■ आकर्षक रंगीत प्रगतीपत्रक नमुने..
■ रिपोर्ट प्रिंटींग साठी १९ थीम्स (प्रत्येक वर्ग/सत्रासाठी वेगळे रंग वापरू शकता..)
■ माहिती भरत असताना प्रोग्रेसबार (कोणती माहिती भरली व भरावयाची राहिली..)
■ एका क्लिकवर सॉफ्टवेअर अपग्रेड..
■ २५ थीम्स असलेले युजरफ्रेंडली 3.0 होमपेज..
■ माहिती भरण्यासाठी विद्यार्थी यादी एका क्लिकवर..
■ वर्णनात्मक नोंदी dropdown लिस्टद्वारे..
■ वर्ग व विषयशिक्षकांसाठी उपयुक्त तक्ते..
■ इतर अनेक जादा तक्ते..
■ तुमच्या संगणकात भरलेल्या माहितीचा सॉफ्टवेअर बंद करतेवेळी आपोआप backup घेतला जातो.
खुप सुंदर सर
ReplyDeletesoftware अतिशय अतिउत्कृष्ट आहे या software चे वर्णन करणेस शब्द अपुरे पडतील
ReplyDeleteधन्यवाद सरजी
Deleteपगार बिल बनवणे व शालेय पोषण आहार बिल बनवणे या साठी सऑफटवेअर बनवा सर
ReplyDeletesupper sir ji
ReplyDeleteतुमच्या कार्याला सलाम सर छान निर्मिती
ReplyDeleteसर, वर्णनात्मक नोंदी export/ import करायच्या आहेत, त्या काय जमत नाहीत. त्याबाबत जरा मार्गदर्शन कराल का? ९९७५६८५९३० दत्ता माने फलटण
ReplyDeleteसर, वर्णनात्मक नोंदी export/ import करायच्या आहेत, त्या काय जमत नाहीत. त्याबाबत जरा मार्गदर्शन कराल का? ९९७५६८५९३० दत्ता माने फलटण
ReplyDeleteमाने सरजी..
Deleteही लिंक पहावी..
वर्णनात्मक नोंदी कशा कराव्या?
आपले योगदान महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधवांसाठी नक्कीच प्रेरणादायक आहे. आपणाला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!!!!
ReplyDeleteafter downloading its not opening in my laptop....
ReplyDeleteSuper siejii
ReplyDeleteखूपच महत्वाचे आहे वेळ वाचतो. नोंदी आकर्षक पध्दतीने करता येतात
ReplyDeletesir mi windows 8 vaparto ahe.cce.3 insattalabe version downlod hot nahi.activation key milali ahe
ReplyDelete9 वी चा निकाल तयार होतो का? link send kara blog chi...
ReplyDeleteSir student photo upload kasa karava
ReplyDeleteVery Nice sir
ReplyDeleteNice Sirji Plz add me your Telegram Chanel 9420177711
ReplyDeleteखूप उपयुक्त आहे सर हे आमच्या साठी,गोरे सर आपले मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील काळात अनेक नवनवीन माहिती आपणाकडून मिळत राहील अशी अपेक्षा करतो.तुम्हाला तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा
ReplyDeleteसर आपले मनापासून अभिनंदन .
ReplyDeleteआपले काम अतुलनिय आहे.
लिंक automatically turn off असा मेसेज येतोय Download होत नाही
ReplyDeleteThanks sir for new version of cce 3.2
Deleteसर, सुंदर कार्य.
ReplyDeleteशाळा प्रवेश, प्रवेश निर्गम, विध्यार्थी हजेरी, मूल्यमापन, निकाल, T C व प्रवेश निर्गम software असेल तर....
sir very nice
ReplyDeleteRegarding CCE 3.2
ReplyDeleteWhat if
1) A student is absent whole term.
2) A student was present for first 2-3 months and migrated somewhere.He is absent for Summative Evaluation.
How to show these students absent?
सुंदर software आहे
ReplyDeleteविद्यार्थी गैरहजर साठी
प्रथम सत्र एकूण गुण व श्रेणी पाहिजे होती
Sorry, this link has been automatically turned off for now. Learn more about traffic limits.हि अडचण येत आहे डाउनलोडला
ReplyDelete3.1 मधील डाटा Export होत नाही. खूप प्रयत्न केला. तुम्हांला मॅसेज ही केला परंतू काही रिप्लाय नाही.
ReplyDeleteसॉरी सर, काही कारणांमुळे मेसेज पहिला गेला नसेल अथवा रिप्लाय दिला गेला नसेल..
Deleteपायाभूत माहितीमधून सर्व डेटा एक्स्पोर्ट केल्यावर जर तुमच्या document फोल्डर मध्ये CCE व त्यामध्ये तुमच्या युडायस कोड असणारा फोल्डर तयार होतो का ते पाहावे. जर असा फोल्डर तयार होत नसेल तर मन्युअली एक्स्पोर्ट मधून एक एक फाईल एक्स्पोर्ट करता येईल.
सर खूपच छान मागील वर्षी मी याचा वापर केला खूप आवडले या वर्षी ३.० डाऊनलोड केले पण नोंदी येत नाही कृपया मार्गदर्शन करा
ReplyDeleteनोंदी फक्त कॉफी एडिशनमध्ये वापरता येतील..
Deleteशाळेचा लोगो कसा बदलायचा
ReplyDeleteसॉफ्टवेअर खूपच छान आहे
ReplyDeleteसर software खूपच छान आहे. मी माझ्या शाळेसाठी वापरत आहे. परंतु एका laptop मधील software ला प्रोब्लेम आलेला आहे. त्यात प्रथम सत्राची संपूर्ण माहिती भरलेली आहे. प्रिंट पण काढलेली आहे. परंतु आता login होत नाही ओपेन होत नाही. कृपया मदत करावी.
ReplyDeleteखूप मेहनत घेतली सर आपण , आपले मनपूर्वक अभिनंदन. एक problem आहे सर, गूगल मराठी इनपुट टूल आता computer मध्ये गूगल चे app किंवा chrome browser वगळता इतरत्र वापरता येत नाही, मराठी typing ला अडचण येत आहे, सोगत्वरे मध्ये मराठीत कसे तुपे करावे याचा एखादा विडिओ किंवा माहिती पाठवा.
ReplyDeleteसर
ReplyDeleteसाफ्टवेयर लॉग आऊट करून कॉम्प्युटर पुन्हा सुरू केली की लॉगीन होत नाही आपण दिलेल्या सूचना प्रमाणे कम्युटर ही बदलून पहिले पण मला तेच प्रोबलम येतोय
very nice work sir its usefull to all teachers
ReplyDeleteblack and white प्रकारातील प्रगतिपत्रक प्रिंट करताना हजर दिवस #Error असे दिसतात
ReplyDeleteत्याचप्रमाणे मला प्रगतीपत्राकावर zp ahmednagar चा लोगो प्रिंट करावयाचा आहे.
मार्गदर्शन करावे.
आपण तयार केलेली सर्व सॉफ्टवेअर खुप सुंदर,छान वर्णन उपयुक्त आहेत. खास करून आपले सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अॅप तर खुपच सुंदर व उपयुक्त.....
ReplyDeleteसर!.. आपल्या कार्यास सलाम
कृपया माझी सर्वांना अशी सूचना आहे की हे सॉफ्टवेअर वापरण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित व्हिडिओ पहावा .त्यातून बऱ्याच शंका निरसन होतील. आणि नंतरच आपला प्रॉब्लेम येथे सांगितलेला उत्तम.
ReplyDeletePlease send this software direct download link .
ReplyDeletecce 3.3 चे नवे version कधी उपलब्ध होईल आणि मला ते कसे उपलब्ध होईल
ReplyDeletecce 4.0 आवृत्ती उपलब्ध झाली आहे. आपण ट्राय करावी.
ReplyDeleteI am CCE 3 Cofee Edition Holder.For 4.0 do i Subscribe again with rs.150
ReplyDeleteहोय सर
Deleteवजन उंचीचा BMI मिळावा
ReplyDeleteBMI Categories:
ReplyDeleteUnderweight = <18.5
Normal weight = 18.5–24.9
Overweight = 25–29.9
Obesity = BMI of 30 or greater
वरील वर्गवारीत BMI माहिती उपलब्ध व्हावी नवीन cce 4.0 आवृत्ती उपलब्ध झाली आहे खूप सुंदर
गोरे सर गुड जॉब
ReplyDeleteActivate key var click kelyavar code taknyasathi kahich yet nahi .software activate hot nahi
ReplyDeleteसर माहिती PDF कशी कराची प्रिंट काढण्यासाठी
ReplyDeleteFor English medium
ReplyDeleteनिकालपत्रक-सर्वसमावेशक = विद्यार्थ्याचे नाव आणि श्रेणी व्यवस्थित दिसत नाही.
प्रगती पुस्तक भाग 1 = "Presenty" हा शब्द चुकीचा आहे. या ठिकाणी Attendance हा शब्द वापरण्यात यावा.
प्रगतीपुस्तक पुस्तक भाग 2 = "Seventh" या शब्दांमधील "h" हा शब्द दिसत नाही.
सर काही सॅम्पल्स मध्ये तुम्ही हा बदल केला आहे परंतु सर्व सॅम्पल्स मध्ये हा बदल करण्यात यावा
सर वरील बदल लवकरात लवकर करण्याची विनंती.
Sir Still you have not made any changes in software. "Presenty" word is still there at many places.
DeleteIt's sincere request to you that, replace "Presenty" word with "Attendance" at all places.
Sir Still you have not made any changes in software.
Delete"Presenty" word is still there at many places.
It's sincere request to you that, replace "Presenty" word with "Attendance" at all places, and "Semister" word with "Semester".
सर माझ्याकडे ऑफिस २०१९ आहे
ReplyDeleteSir, This software is not working in window 10. What to do?
ReplyDeletePlease reply
Deleteसर software मध्ये Database
ReplyDeleteDatabase1
Database2
असे copy होत आहे
plz reply
ReplyDeletecan we run this software on microsoft office student and home 2019 ?
ReplyDeleteमि हे SOFTWARE DOWNLOAD केलेले आहे ( COFFEE EDITION ).काही प्रमाणात माहिती भरलेलीे आहे.परंतू उरलेली माहिती भरण्यासाठी दुसर्या PC वर OPEN करण्याचाा प्रयत्न केला.पण EXTRACT होऊनही OPEN होत नाही.
ReplyDeleteसर ....
ReplyDeleteकोविड -१९ मुळे या वर्षी १ ली ते ८ वीच्या वार्षिक परीक्षा होणार नाहीत. त्यामुळे द्वितीय सत्राचे फक्त आकारिकचे गुणच Software मध्ये भरलेले आहेत. त्यामुळे द्वितीय सत्रातील प्रिंट काढत असताना श्रेणीचा मोठा प्रोब्लेम होत आहे कारण सर्व मुलांच्या श्रेणी इ-१ दाखवत आहेत. तरी त्यादृष्टीने Software अपडेट करावे ही नम्र विनंती.
नमस्कार सर ....
ReplyDeleteमी आपले software मागील वर्कोषापासून माझ्विया शाळेत 1 टे ८ वर्डगात वापरत आहे. सद्या कोविड -१९ मुळे या वर्षी १ ली ते ८ वीच्या वार्षिक परीक्षा होणार नाहीत. त्यामुळे द्वितीय सत्राचे फक्त आकारिकचे गुणच Software मध्ये भरलेले आहेत. आकारिक गुणांवरच श्त्यारेणी द्मुयावी असे प्नशासना कडून सांगण्यात येत आहे. कृपया आपण Software अपडेट करून आम्हा सर्व शिक्षकांची मोठी अडचण दूर करावी ही नम्र विनंती.
संकलित रद्द चे गुण कमी करण्यासाठीचे काम किचकट होते. यामुळे अपडेट होण्यास विलंब लागला. आता आपण डाउनलोड करू शकता.
Deletegreat
ReplyDeleteAwaysome...
ReplyDeletecce4.0 संकलित2 रद्दचे update दिसत नाही त्यासाठी काय करावे लागेल CCE4.5 हे नवीन घ्यावे लागेल का
ReplyDeletecce हेल्प ग्रुपची लिंक ओपन होत नाही
ReplyDeleteCCE4.5 SOFWARE अतिशय सुंदर अपडेट केले सर. Many many thanks sir...
ReplyDeleteसंकलित सत्र २ रद्द झाल्याने नवीन सुधारणा करून श्रेणी कशी द्यावी update टाकावे
ReplyDeleteतुमचे cce सॉफ्टवेअर खूपच छान आणि शिक्षकांचे काम खूप स्मार्ट करणारे आहे आपल्या मेहंनातीला ,बुद्धिमत्तेला सलाम.
ReplyDeleteपुढील वाटचालीस शुभेच्छा
धन्यवाद सरजी..!!
DeleteCCE 4.5 आणि 4.6 एकच आहे का की काही updates आहेत 4.6 मध्ये
ReplyDeleteएकाच शाळेचे अनेक पिसीवरील काम एकत्र करणे व शेकडेवारी नमुना 2 C ची वाढ केली आहे.
Deleteसंकलित सत्र २ रद्द झाल्याने नवीन सुधारणा करून श्रेणी कशी द्यावी update टाकावे
ReplyDeleteमागील सर्व जुन्या वर्जनला सत्र २ ची श्रेणी सुधारणा करावी हि विनती कारण आम्ही जुन्या मध्ये सत्र १ चा निकाल केला आहे
ReplyDeleteआपल्या गरजेनुरूप अपडेट केले आहे सोबत व्हिडीओ लिंक दिल्या आहेत त्यांचाही उपयोग करावा. धन्यवाद!!
DeleteTHANKS
DeleteCce 4.6 मध्ये श्रणी तक्ता open होत नाही .data mismatch in criteria expression असा error येतो
ReplyDeleteकामाचे दिवस भरताना YEAR ID येत नाही. त्यामुळे वार्षिक उपस्थिती भरता येत नाही.
ReplyDeleteमुख्याध्यापक सही HM-1 व HM-२ ह्या नावाने img मध्ये टाकली तर आपोआप save होते वर्गशिक्षक सही साठी कोणते अक्षरे वापरावी plz post
ReplyDeleteसर मी phonePe ने आत्ताच पेमेंट केले लिंक पाठवा
ReplyDeleteCCE 4.6.11 Down Lod करणे साठीमार्गदर्शन करावे Code मिळाला आहे.
ReplyDeleteCCE software कशा प्रकारे बनवण्यात आले आहे त्याविषयी चा संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती चा विडिओ आपण तयार केला तर ms-access मध्ये साॅप्टवेअर कसे बनवायचे हे समजण्यास मदत होईल.
ReplyDeleteआशा करतो की आपण अशा प्रकारचा विडिओ बनवला.
।। धन्यवाद ।।