WHAT'S NEW?
Loading...

Excel Cell DropDown List

www.s2gsoftware.in

एक्सेलमध्ये Drop-Down List अगदी सोप्या पद्धतीने कशी तयार करावी ते आज पाहूया. ही लिस्ट आपणास दोन प्रकारे तयार करता येते. दोन्ही पद्धती सहाव्या मुद्द्यात आल्या आहेत..



  1. ज्या सेलमध्ये ड्रॉप डाऊन लिस्ट हवी ती सेल अथवा सेल रेंज सिलेक्ट करा.
  2. Data मेनू सिलेक्ट करा.
  3. Data Validation निवडा.
  4. पुन्हा त्यातील Data Validation निवडा.
  5. आता Data Validation चा बॉक्स येईल त्यातील सेटिंग्ज मधील Allow मध्ये List निवडा.
  6. Source मध्ये तुमची लिस्ट स्वल्पविराम देऊन टाईप करा. अथवा...
    तुमची लिस्ट जर या वर्कशीटवर इतर ठिकाणी असेल तेथून उभ्या / आडव्या सेलना निवडा. ओके निवडा.
  7. जर तुम्ही एकच सेल सिलेक्ट केली असेल आणि ही ड्रॉप-डाऊन-लिस्ट इतर ठिकाणी हवी असेल तर कॉपी-पेस्ट करा. किंवा. सेल ड्रॅग करा.
  8. आता त्या सेलपैकी कोणतीही सेल सिलेक्ट करा. उजवीकडे एक त्रिकोण येईल त्यावर क्लिक करा. ड्रॉप डाऊन बॉक्स तयार...
यामुळे टाइपिंगचा वेळ वाचेल शिवाय लिस्ट पेक्षा वेगळा मुद्दा लिहिला जाणार नाही.

हा एक्सेल फाईल नमुना हवा असल्यास येथून डाऊनलोड करून घ्या.
(Size :10 KB, Type: xlsx file, Works with Excel 2007 and above, Made in Excel 2013)

आपणास एक्सेलच्या आवश्यक सूत्रांची माहिती पूर्णपणे मराठीत येथे देण्याचा मानस आहे..
इतर अनेक क्लुप्त्या इथे देण्याचा प्रयत्न असेल तेव्हा भेट देत राहा.

धन्यवाद...!

7 comments: Leave Your Comments

  1. Thnks for very important technique

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks. I am going to give such type of information regularly.

      Delete
  2. आभारी आहोत सर अशीच महत्वपूर्ण माहिती देत रहा धन्यवाद

    ReplyDelete
  3. गोरे सर अत्यंत उपयुक्त माहिती.धन्यवाद.

    ReplyDelete
  4. सर,एक्सेल निकालामध्ये मूले व मुली श्रेणीनिहाय वेगवेगळी संख्या कशी काढावी

    ReplyDelete