WHAT'S NEW?
Loading...

पावरपॉइंट मधून स्वतःचे टेम्प्लेट कसे तयार कराल?


पावरपॉइंट हे स्लाईड शोसाठी खूप चांगले माध्यम आहेच. त्यातील तयार थीम व टेम्प्लेट आपल्यासाठी जर तुम्ही आकर्षक नजरेत भरणारी प्रेसेंटेशन तयार करावयाची असतील तर ती योग्य ठरू शकतीलच असे नाही.

चला आज आपण Blank Presentation घेऊन आपणास हवे तसे template कसे करावे ते पाहूयात. यामधील सर्व स्टेप्स सोप्या आहेत.


 1. पावरपॉइंट चालू करून File → New → blank presentation निवडा.
 2. स्लाईडला background, font, color आदि गोष्टी बदलण्यासाठी view → Slide Master मध्ये जा.
  आता वरीलप्रमाणे स्क्रीन दिसेल.
 3. डावीकडील Slide Navigation मधून आपण न वापरणारी slide layout डिलीट करणार आहोत. नको असणारी स्लाईडवर राईट क्लिक करा. व Delete करा. (ऑप्शनल)
 4. टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर क्लिक करून Format Background निवडा.


 5. उजवीकडे एक Format Background ची Window Pane दिसेल त्यातील Gradient निवडा.
 6. Type → radial
 7. Gradient Stop मधील प्रत्येक Stop वर क्लिक करून Color मधून आपल्या आवडीचे कलर निवडा. हे कलर शक्यतो Theme Colors मधील असावेत. ते एका अथवा दोन स्तंभातील असले तरी चालतील.
 8. योग्य बदल दिसेल. समाधानकारक बदल झाल्यावर Apply to all म्हणा. (जर प्रत्येक प्रकाराला वेगळे background हवे असेल तर तसेही करता येईल पण ते प्रोफेशनल वाटत नाही.
 9. आता प्रत्यक्ष स्लाईडवर येऊया. प्रथम पहिली स्लाईड सिलेक्ट करा. स्लाईवडील प्रत्येक बॉक्सला सिलेक्ट करून प्रत्येकाला रंग निवडा. (Format → Text Fill)
 10.  तुमचा फोटो / लोगो प्रत्येक स्लाईडवर दिसण्यासाठी Insert → Picture insert करून ते योग्य ठिकाणी adjust करा.


 11. Master slide → fonts मधून पुढीलप्रमाणे तुमच्या आवडीचे फॉन्ट निवडा. Heading font व body font दोन्ही ठिकाणी बदला आणि Name → योग्य नाव देऊन सेव करा. (यामुळे पुन्हा कधी हेच फॉन्ट वापरावयाचे झाल्यास हे नाव सिलेक्ट करून वापरू शकता.
 12. कलर्स मधून जाऊन पहा कसे सर्व स्लाईडचे रुपडे बदलते ते..! आवडल्यास निवडा.(ऑप्शनल)
  आणखी काही बदल वाटल्यास करा. अन्यथा view मधून Normal View वर या.
 13. File → Save as. बॉक्स येईल.
 14. Save as type → PowerPoint Template निवडा.
 15. लोकेशन जी आहे ती असुद्या. सेव करा.
 16. आता तुमचे टेम्प्लेट तयार झाले आहे. ते वापरून पहा. सर्व close करा.


 17. File → New → Blank presentation.
 18. Design → थीम्सच्या उजवीकडील त्रिकोणावर क्लिक करा.
 19. Brows for themes → my documents → custom office templates या मार्गावरून तुमचे टेम्प्लेट निवडा.
 20. Design → variants → colors.. कलर सेट बदलून पहा.
खूप छान..! आता तुम्ही तुमचे स्वतःचे टेम्प्लेटतयार केलेत. यामुळे तुमच्या स्लाईड शोला प्रोफेशनल लुक येईल.
पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद...!

स्लाईड शोमध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात ? प्रोफेशनल स्लाईड शोमध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात ते जरूर वाचा...

2 comments: Leave Your Comments