WHAT'S NEW?
Loading...

Airdroid च्या मदतीने मोबाईल पीसीला कसा कनेक्ट करावा?


पीसीला मोबाईल AirDroid च्या मदतीने कनेक्ट करून तो पिसीवरून ऑपरेट करू शकतो.

आवश्यक हार्डवेअर / सॉफ्टवेअर :
  • पीसीसाठी Wi-Fi (Install Wi-Fi Driver If not done already)
  • Wi-Fi नसेल तर USB केबल आवश्यक
  • मोबाईल साठी Airdroid App इंस्टॉल करून घ्यावे.

USB केबलद्वारे कनेक्ट करणे:

  1. USB केबलने मोबाईल पीसी / लॅपटॉपला जोडा.
  2. मोबाईलमधील Aridroid App सुरु करा.
  3. Tethering वर टच करा.
  4. Enable USB tethering Enable निवडा.
  5. USB tethering ला चेकमार्क करा.
  6.  एक स्टेप मागे या.
  7. तुमचा ब्राउझर सुरु करा.
  8. अड्रेस बार वर http://web.android.com वर अथवा http://192.168.42.129:8888 टाईप करून इंटर करा. (या प्रकरचा तुमच्या मोबाईल मध्ये दिसणारा अड्रेस)
  9. मोबाईलवर मेसेज दिसेल. Accept करा.
  10. मोबाईलवर Local Connection Mode कनेक्टेड दाखवेल.
  11. आता पीसीच्या ब्राउझरमधून तुम्ही तुमचा मोबाईल ऑपरेट करू शकता. Good Luck…!

Wi-Fi द्वारे कनेक्ट करणे:

 कनेक्ट करताना : अ , ब / क स्टेप वापरा.

अ) कनेक्ट करताना :
  1. मोबाईलमधील Aridroid App सुरु करा.
  2. Hotspot वर टच करा.
  3. Start Hotspot निवडा.
  4. येथील Network SSID व पासवर्ड पहा.


ब) पीसीमध्ये सेटिंग्ज तयार करणे (First time only)
  1. पिसीमधील टास्कबारवरील Wireless Logo (टावर सारखे चिन्ह) वर क्लिक करा.
  2. काही क्षणात AirdroidAP असे नेटवर्क सर्च होईल.
  3. त्यावर क्लिक करून Automatically Connect ला चेकमार्क करून Connect  वर क्लिक करा.
  4.  Security Key पासवर्ड टाका. ( Step 4) व OK वर क्लिक करा.
  5. Connected असा मेसेज दिसेल व Wi-Fi चा रंग पांढरा होईल.
  6. आता मोबाईलमध्ये एक स्टेप मागे या.
  7. मोबाईलमध्ये एक वेब अड्रेस दिसेल. (http://192.168.43.1:8888)
  8. आता पीसीच्या Browser मध्ये जा.
  9. Browser मधील अड्रेस बार मध्ये http://192.168.43.1:8888 टाईप करा. व Go बटण अथवा इंटर की प्रेस करा.
  10. मोबाईलवर Request to connect मेसेज येईल.
  11. Accept निवडा.
  12. आता पीसीच्या Browser मध्ये तुम्हाला मोबाईल ऑपरेशनची आयकॉन्स दिसतील. उजवीकडे फोनचे नाव दिसेल.
  13. मोबाईलवर Local Connection Mode वरील वेब अड्रेस दिसेल. त्याखाली Disconnect बटण असेल
  14. छान...! तुम्ही आता मोबाईल पिसीवरून ऑपरेट करण्यास तयार आहात. Good Luck.
क) नेहमी कनेक्ट करताना –
  1. एकदा सेटिंग्ज केल्यावर वारंवार कनेक्ट करताना फक्त
  2. मोबाईलमधील Aridroid App सुरु करा.
  3. Hotspot वर टच करा.
  4. Start Hotspot निवडा.
  5. पिसीमधील टास्कबारवरील Wireless Logo (टावर सारखे चिन्ह) वर क्लिक करा. काही क्षणात AirdroidAP असे नेटवर्क सर्च होईल. Connect करा. (गरजेचे नाही अपोआपसुध्दा होते.)
  6. Browser मधील अड्रेस बार मध्ये http://192.168.43.1:8888 टाईप करा. व Go बटण अथवा इंटर की प्रेस करा. (अथवा Bookmark करून घ्या.)
  7. मोबाईलवर Request to connect मेसेज येईल. Accept निवडून काम सुरु करा.
Airdroid ने आपण काय काय करू शकतो ते जरूर वाचा.
काही समस्या असल्यास जरूर कमेंट करा.

7 comments: Leave Your Comments

  1. Sir खुप छान माहिती

    ReplyDelete
    Replies
    1. सत्यवान सर, धन्यवाद..

      Delete
  2. Replies
    1. प्रकाश सर, भेट देत राहा. आभार..!

      Delete
  3. नमस्कार गोरे सर, आपल्या वेबपेजवर अतिशय उपयुक्त माहितीचा खजिना उपलब्ध
    झाला आहे याचा फायदा आमच्या सारख्या नव्याने शिकणाऱ्यांना होत आहे. आपल्या या कार्यास खुप खुप शुभेच्छा. अशाच प्रकारची एम एस अक्सेस बद्दल काही महिती असल्यास नक्की अपलोड कराल अशी आशा बाळगतो. धन्यवाद!

    ReplyDelete
  4. SIr very good informations
    Easy understaning thank you

    ReplyDelete