WHAT'S NEW?
Loading...

विंडोज 7 मधे वेळ 12 ताशी व दिनांक स्वरूप भारतीय प्रमाणे कसे कराल?


ही पोस्ट वाचल्यानंतर आपण -
  • संगणकाच्या वेळेचे स्वरूप १२ताशी करू शकाल.
  • दिनांक स्वरूप भारतीय अथवा आपल्याला हवे तसे करू शकाल.
Start → Control Panel → Region and Language मध्ये जा. एक विंडो ओपन होईल.Formats टॅबवर जा.

{* हे Format करताना सुरुवातीस
Format ► English (India) किंवा Marathi (India) किंवा Hindi (India) आणि
Location ► India निवडल्यास योग्य ठरेल.}

आता Additional Settings बटण निवडा. एक विंडो ओपन होईल.
यामध्ये Time या टॅबवर जा.
वेळेचा Format बदलण्यासाठी सर्व माहिती तेथेच खाली दिली आहे. त्याप्रमाणे हवा तसा बदल करा.
*नोट : वापरावयाची चिन्हे { हे 'h' बारा ताशी वेळेसाठी आणि  हे 'H' चोवीस ताशी वेळेसाठी वापरतात.}

चिन्ह अर्थ
h 12 hours
H 24 hours
m minute
s second
tt AM or PM
hh, mm, ss दोन अंकांसाठी
h, m, s शून्य नसेल तर एक अथवा दोन अंकांसाठी

जसे : जर वेळ 8:25 PM अशी हवी तर असे बदल करावेत.
तेथे असे टाईप करावे. -

Short time ► h:mm
Long time ► h:mm:ss tt असे लिहा व Apply बटण क्लिक करून रिजल्ट पहा.

**जर तुम्हास वाटले तर तुम्ही 'AM / PM' symbol मराठी भाषेत 'दु.पु. / दु.नं.' Unicode वापरून लिहू शकता.
या पद्धतीने दिनांकचा Format बदलण्यासाठी Date टॅबवर जा.

*नोट : वापरावयाची चिन्हे
चिन्ह अर्थ
d एक वा दोन अंकी दिनांक
dd दोन अंकी दिनांक
ddd दिवस तीन अक्षरामधे
dddd दिवस पूर्ण शब्दामधे
yy दोन अंकी वर्ष
M एक वा दोन अंकी महिना
MM दोन अंकी महिना
MMM तीन अक्षरामधे महिना
MMMM पूर्ण शब्दामधे महिना
yyyy चार अंकी वर्ष

हव्या तशा बदला व Apply बटण क्लिक करून रिजल्ट पहा.
यामुळे तुमची दिनांक 25-10-2015 अशी दिसेल.
काही चुकल्यास Reset बटण वापरा.


♥ वरील प्रमाणे दिनांक बदलल्यास ग्लोबल पातळीवर दिनांक Format बदलल्याने इतर सॉफ्टवेअरमधील दिनांक Format बदलेला दिसेल.

जसे. - Excel मधील दिनांकचा Format
♥ याच पद्धतीने तुम्ही संख्या व रुपये यांचे Format आपणस हवे तसे करू शकता.

उपयुक्त वाटल्यास इतरांशी हा वेब अड्रेस देऊन आपल्या व इतरांच्या ज्ञानात वाढ करावी...
धन्यवाद..!

2 comments: Leave Your Comments