WHAT'S NEW?
Loading...

मोबाईलमध्ये कॉपी केलेला कंटेंट पीसीमध्ये कसा पेस्ट कराल?


सध्या मोबाईलवर WhatsApp | Hike | Facebook व इतर मेसेंजर यांचा खूपच वापर वाढला आहे. यामधील चांगले मेसेज कॉपी करून आपल्या संगणकात घेताना फाईलस्वरुपात घ्यावे लागतात. इतर माध्यमातही घेता येत असेल.
पण जर मोबाईलवर कॉपी केलेला डेटा लगेच कॉम्पुटरवर पेस्ट करता आला तर खूप वेगाने काम होईल.
चला खूप सोपे काम आहे हे!

आवश्यक सॉफ्टवेअर :
  • मोबाईलसाठी Airdroid
  • पीसीसाठी फक्त कोणताही Browser

जोडणी:
प्रथम मोबाईल व कॉम्पुटर एकमेकास या सॉफ्टवेअरच्या मदतीने जोडून घ्या.
जोडणी माहित नसल्यास Airdroid च्या मदतीने मोबाईल पीसीला कसा कनेक्ट करावा ते वाचावे.


पद्धत:
  1. मोबाईलवर कोणताही कंटेंट कॉपी करा. (Text)
  2. कनेक्शन पूर्ण झाले असल्यास ब्राउझरवर उजवीकडे ToolBox आहे तेथील Clipboard निवडा.
  3. त्याखाली दिसत असलेल्या काळ्या बॉक्सच्या उजवीकडे रेफ्रेश बटनावर क्लिक करा.
  4. क्षणात तुमचा मेसेज त्याच बॉक्समध्ये येईल.
  5. राईट क्लिक करून Select All निवडा अथवा (Ctrl + A)
  6. सिलेक्ट झालेल्या कंटेंटवर पुन्हा राईट क्लिक करून Copy निवडा. (Ctrl + C)
  7. आता सर्व कंटेंट तुमच्या पीसीच्या क्लीपबोर्डमध्ये आला आहे. तो कोणत्याही एडिटरमध्ये (Notepad / Word) जाऊन पेस्ट (Ctrl + V) करा.
सोपे आहे ना? चला तर लगेच टेस्ट करून पहा.
कॉम्पुटरवर टाईप केलेले टेक्स्ट कंटेंट जर कॉम्पुटर वर कॉपी केल्या केल्या मोबाईलवर कसा पेस्ट करावा यासाठी वाचा.

Enjoyed this post..! आणखी मदत करण्यास आवडेल..! प्रतिक्रिया दयाव्यात. धन्यवाद..!

5 comments: Leave Your Comments

  1. sir,very nice helpful website for all techsavvy teachers. Thanks to you for giving all best information about technology

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you sonawane sir,
      Time to time, I shall try to share information.

      Delete
  2. सातवा मुद्दा थोडा चुकला होता. आपण तो समजून घेतला असेल. त्यात बदल करून अपडेट केला आहे. 'वाचा' ची लिंक दुरुस्त केली आहे.
    धन्यवाद...

    ReplyDelete