WHAT'S NEW?
Loading...

Google Input Tools मध्ये सहज ट्रान्सलेट न होणारे शब्द कसे लिहावे व नियंत्रित करावेत?


गुगल इनपुट टूल्स मराठी टायपिंगसाठी खूप सहज व सोपे असे टूल आहे.
मराठी इंग्रजीतून लिहली की मराठी लिहिली जाते.


कधी कधी असे शब्द येतात की ते आपणास हवे तसे लिहले जात नाहीत.  अशा वेळी काही उपयुक्त पद्धती.

शब्द तोडून लिहणे:

जसे- नागनाथवाडी हा पूर्ण शब्द लिहला जाताना अडचण येते.
येथे नागनाथवाडी असे दोन वेगळे शब्द लिहावेत.
नागनाथ नंतर Enter व वाडी नंतर Spacebar की दाबल्यास वेगाने काम होईल आणि योग्य शब्द पटकन लिहला जाईल.
पँट सारखे शब्द जर वारंवार लिहायचे असतील तर तो लिहिता येत नाही. त्यासाठी पुढील प्रकारे प्रयत्न करावा लागतो.

फ्लोटिंग कीबोर्ड वापर :

  1. फ्लोटिंग कीबोर्ड सुरु करा.
  2. प + ँ + ट  .. या क्रमाने फ्लोटिंग कीबोर्डवरील अक्षरे माउसने प्रेस करा.
  3. या प्रकारे आणखी काही शब्द लिहिता येत नसतील तर वरीलप्रमाणे प्रयत्न करावा लागेल.

वारंवार लागणारे शब्द जतन करणे:

काही शब्द वारंवार टाईप करावयाचे असतील तर ते कायमस्वरूपी सेव करून ठेऊ शकतो.
यासाठी पुढीलप्रमाणे कृती करावी.

  1. Menu → Manage Macros
  2. Add बटणावर क्लिक करावे.
  3. Macro Text ► pant असा शब्द लिहा.
  4. Macro Target ►मध्ये पँट असे लिहा. यासाठी वरील पद्धत वापरू शकता. कॉपी पेस्ट पद्धत वापरली तरी चालेल.
  5. शेवटी Save बटण दाबा. या पद्धतीने आपणास हवे तसे वारंवार लागणारे अनेक शब्द येथे जतन करू शकतो.
  6. शब्द रिमुव्ह करण्यासाठी तो शब्द सिलेक्ट करा व Remove बटण प्रेस करा. Save करा.
आता टायपिंग करताना फक्त pant टाईप करा. हवा असणारा शब्द यादीत वर येईल.

2 comments: Leave Your Comments