WHAT'S NEW?
Loading...

Adobe ImageReady मध्ये Animated GIF इमेज कशी तयार करावी?

आज आपण सोप्या पद्धतीने MS PowerPoint व Adobe Imageready च्या मदतीने Animated GIF इमेज कशी तयार करावी ते पाहूया.



वापरलेली सॉफ्टवेअर:

  • MS PowerPoint
  • Adobe ImageReady: फोटोशॉप सोबत हे Install होणारे सॉफ्टवेअर आहे. वेगळे शोधण्याची गरज नाही. 
Adobe ImageReady पुढील प्रकारे चालू करू शकता.
  • स्टार्ट वर क्लिक करून Search Programs and Files येथे ImageReady असा सर्च द्या.
  • फोटोशॉप चालू करून File मेनुतून Edit in ImageReady हा ऑप्शन निवडा. अथवा Shift + Ctrl + M की प्रेस करा.

  • PowerPoint मधून इमेज तयार करणे.

  1. PowerPoint ओपन करून त्यातील सर्व कंटेंट Ctrl + A करून Delete करा.
  2. Insert Menu मधून Shapes मधून स्टार insert करा.
  3. Star ला सिलेक्ट करून Format मधून त्याचा रंग बदला.
  4. Right Click करून Edit Text ऑप्शन निवडा.
  5. ‘New’ असे टाईप करा. योग्य फॉन्ट साईज निवडा.
  6. स्टार वर Right Click करून Save Picture As ऑप्शन निवडा.
  7. डेस्कटॉपवर एक ‘image’ फोल्डर तयार करा व त्यात ही फाईल सेव करा. (Picture1.png)
  8. आता या स्टार चा रंग बदला व पुन्हा ६ ची कृती करून फाईल सेव करा. (Picture2.png)
www.s2gsoftware.in
PowerPoint मधून इमेज कशी तयार करावी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करावी.

  • Adobe ImageReady मधून ते GIF मध्ये रुपांतरीत करणे.

www.s2gsoftware.in
  1. Adobe ImageReady सुरु करा.
  2. File → Import → Folder as frames वर क्लिक करा.
  3. डेस्कटॉप निवडून त्याखाली ‘Image’ फोल्डर सिलेक्ट करा. आता वरीलप्रमाणे दिसेल. 
  4. 0 Sec आहे तेथे right click करून दोन्ही फ्रेमची वेळ 0.5 सेकंद करा.
  5. फाईल ऑप्शन निवडून Save Optimized as ऑप्शन निवडा.
  6. नाव व लोकेशन निवडा. Save बटण क्लिक करा.
  7. तुमची GIF इमेज तयार झाली. ती IE (Internet Explorer) मधून ओपन करा. ती Animate होईल.
खूप छान..! आता तुम्ही केलेली GIF फाईल अशी दिसेल.
www.s2gosftware.in
या पद्धतीने तुम्ही आपला लोगो, आकर्षक बटण तयार करू शकता. (अधिक माहिती) यासाठी PowerPoint चा चांगल्या पद्धतीने वापर होऊ शकतो. अशाच प्रकारे केलेली आणखी एक इमेज पहा.
www.s2gsoftware.in
 काही शंका आल्यास जरूर पोस्ट लिहा. आवडल्यास प्रतिक्रिया द्या.
 या पद्धतीने मराठीतील आणि इंग्रजीतील मुळाक्षरे तयार करता येतील. सॉफ्टवेअर निर्मितीसाठी काही इमेज तयार केल्या होत्या. त्या खाली आहेत. त्या पावरपॉइंट मधून व्हिडीओत बदलल्या खूप सुंदर इफेक्ट मिळाला.

www.s2gsoftware.in www.s2gsoftware.in www.s2gsoftware.in


संपूर्ण मराठीच्या मुळाक्षरांचा संच आपण  डाऊनलोड  करून आपल्या अध्यापनात वापरू शकता.
(Size :992 KB, Type: RAR file, Original Quality)

22 comments: Leave Your Comments

  1. So good information. Thanks

    ReplyDelete
  2. Very very nice my friend sanjayji!!!!!!
    गोरे सर मी एक " शिक्षण "नावाने what's app ग्रुप
    बनवलाय आहे.यामध्ये सातारा बीड पुणे अ.नगर
    सोलापूर नाशिक. ....इत्यादी जिल्ह्यातील वेगवेगळ्या
    माहिती उपलब्ध असलेले शिक्षक आहेत. कृपया
    तुमचे नाॅलेज या ग्रुपवर टाकत रहा.
    हा ग्रुप फक्त अशा लोकांसाठी आहे.
    8275407939

    ReplyDelete
    Replies
    1. सत्यवान सर.. आपण चालवत असलेला ग्रुप आणि ग्रुपमधील माहिती खूप उपयुक्त आहे. मी अवश्य माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करेन.. Thanks..

      Delete
  3. very good information sir
    keep it up

    ReplyDelete
  4. सरजी खुपच उपयुक्त माहिती मिळते...धन्यवाद सरजी

    ReplyDelete
    Replies
    1. प्रविण सर, आपला ब्लॉग मी पहिला आहे सुंदर आणि उपयुक्त माहिती आहे.

      Delete
  5. sir very nive iformation provide to us..... thanks.....
    sir We have talked on call about excel...thnks again

    ReplyDelete
    Replies
    1. हेमंत सर, धन्यवाद..!
      पुन्हा आपण दोनदा फोनवर बोललो होतो मला आठवते आहे. नवीन व उपयोगी माहिती नेहमी अपडेट होत राहील तेव्हा संपर्कात राहू..

      Delete
  6. Nice sirji

    exel मध्ये नविन महिती असेल तर अपलोड करा

    ReplyDelete
    Replies
    1. दिलीप सर, आठवड्यातून एक-दोनदा माहिती पोस्ट करण्याचा माझा प्रयत्न आहेच. आणि एक्सेलबद्दलही पोस्ट येत राहतील. आपणास एखादी समस्या असल्यास त्यावरही माहिती लिहिता येईल. संपर्कात राहूया.
      धन्यवाद..!

      Delete
  7. माझे मित्र अमोल ढावरे सर यांनी मला या साईटबद्दल माहिती दिली. .आपल्या सर्व सोफ्त्वरेचा आणि माहीतीचा मला खूप खूप फायदा झाला आणि होत आहे. धन्यवाद.

    ReplyDelete
  8. सर 4.0 CCE अतिशय सुंदर फक्त विद्यार्थी संचयिका कशा भराव्यात ह्या विषयी चा व्हिडिओ टाकणे

    ReplyDelete