WHAT'S NEW?
Loading...

पावरपॉइंट : इमेज इफेक्ट


पावरपॉइंट हे इमेज इफेक्टसाठीही खूप उपयुक्त आहे. अगदी कमी वेळेत तुम्हाला चांगले परिणाम साधता येतात. आणि खूप युजरफ्रेंडलीही...!



Picture Tools मध्ये Format या मेनूमध्ये अनेक उपयुक्त टूल्स व तयार इफेक्ट दिलेले आहेत. चित्र पाहिल्यास हे लक्षात येईल.


टूल्सवर एक नजर आणि थोडक्यात स्पष्टीकरण..
ग्रुप टूल्स स्पष्टीकरण
Adjust Remove Background चित्राची पार्श्वभूमी (बॅकग्राउंड) काढून टाकणे
Correction Brightness/Contrast Soften/Sharpen
Color चित्राचा रंग बदलणे
Artistic Effect विविध कलायुक्त तयार इफेक्ट
Compress Picture चित्राचे Resolution कमी करणे.
Change Picture चित्राचे सर्व इफेक्ट कायम ठेऊन चित्र बदलणे.
Reset Picture चित्र पूर्वस्थितीत आणणे.
Picture Style -- चित्राचे विविध तयार स्टाईल्स.
Picture Border चित्राची बोर्डर सेटिंग्ज
Picture Effect चित्रांचे थ्रीडी व इतर सेटिंग्ज
Picture Layout चित्र/ चित्रे सिलेक्ट - रुपांतर तयार आकर्षक layout मध्ये.
Arrange Bring Forward चित्र इतर चित्रांच्या/ ग्राफिक्सच्या पुढे आणणे.
Send Backward चित्र इतर चित्रांच्या/ ग्राफिक्सच्या मागे नेणे.
Selection pane डायरेक्ट चित्र दिसणे बंद/चालू करणे. चित्र सिलेक्ट करणे.
Align चित्रांची मांडणी (खूप उपयुक्त)
Group चित्रांचे ग्रुपिंग करणे.
Rotate चित्र ठराविक अंशात फिरवणे.
Size Crop चित्र कातरणे / नको असलेला भाग काढून टाकणे.
Width चित्राची रुंदी
Height चित्राची उंची adjust करणे.

विविध इफेक्ट व त्याची माहिती घेतल्यास लक्षात येईल की फोटोशॉपमधील बरेच काम सोप्या पद्धतीने आपण येथे करू शकतो.
चित्र हे प्रेझेंटेशनमध्ये जसेच्या तसे वापरण्यापेक्षा त्याला आकर्षक इफेक्ट दिल्यास एकजिन्सीपणा वाढेल आणि मोहक कलाकृती तयार होईल.

पहिले चित्र जसेच्या तसे वापरले.
दुसरे Artistic Effect- Blur, तिसरे Color-Blue तर चौथे Artistic Effect- Pastel Smooth कमी वेळात चांगला, तयार तरीही खूप नयनलोभस परिणाम..!

4 comments: Leave Your Comments